आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्व-संरक्षणासाेबतच घेतला समाजसेवेचा वसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्व-संरक्षणाचे धडे घेतांना शालेय विद्यार्थिंनी )
अमरावती- शहरात आॅल महाराष्ट्र थांगता असोसिएशन या भारतीय पारंपरिक मार्शल आर्टचे प्रशिक्षण, प्रचार प्रसार करणाऱ्या संघटनेने सुरुवातीपासूनच समाज सेवेलाही वाहून घेतले आहे. खेळासाेबतच समाजसेवा करणारी ही अमरावती शहरातील एकमेव संघटना असल्याचे संघटनेच्या सचिवांनी सांगितले.

अाजवर गरजू गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांचे मोफत वाटप करण्यासोबतच त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही या संघटनेतर्फे दिली जात होती. त्यात आणखी काही समाजोपयोगी उपक्रमांची भर पडली आहे. संघटनेतर्फे साईनगर-अकोली मार्गावरील स्वामीनारायण मंदिरात धर्मार्थ होमिओपॅथी दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. येथे सर्वांनाच मोफत उपचार औषध मिळणार आहे. बीएचएमएस डाॅ. प्राजक्ता सानप या मंदिरात गरजूंना औषध देतील.

थांगता संघटनेने आजवर जिल्ह्यातील १० हजार महिलांना मोफत आत्मरक्षणाचे धडे दिले असून अनेक गरजू गरीब मुलांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांच्या वह्या पुस्तकांची सोय केली आहे. याशिवाय उन्हाळ्यात डे बोर्डिंग शिबिराचेही आयोजन केले जाते.
बाहेरच्याविद्यार्थ्यांसाठी भोजनाची सोय : भविष्यातसंघटना बाहेरून शहरात कामानिमित्त येणाऱ्या गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करणार आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून हा उपक्रम खर्चिक असल्यामुळे अत्यंत कमी दरात सर्वांना परवडेल असे जेवण दिले जाईल, अशी माहिती असो.चे सचिव महावीर धुळधर यांनी दिली.

स्वरक्षणासाठी मुलींना भारतीय पारंपरिक मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले जात आहे.
आॅल महाराष्ट्र थांगता असो.ने एकवर्षापासून अभिनव उपक्रम सुरू केला असून जिल्ह्यात एक लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केेला आहे. या कामी शक्य असेल तेव्हा ज्येष्ठ नागरिक मंडळांची मदत घेण्यात आली. शहरातील मैदाने, उघड्या टेकड्या डोंगरांवर असे वृक्ष लावले जात आहेत, ज्यांना जगवण्यासाठी पाणी, खत द्यावे लागत नाही. आजवर हजारो झाडे अमरावतीच्या परिसरात संघटनेतर्फे लावण्यात आली. त्यांनी स्वत:च्या पैशाने रोपटे घेऊन त्यांची लागवड केली.