आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपोवन वसतिगृहातील अत्याचार उघड करणाऱ्या महिला पत्रकाराचा आज सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून तपोवन येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या महिला पत्रकार पुष्पा जैन यांचा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते शनिवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता जिल्हाशिकारी कार्यालयात सत्कार केला जाणार आहे.
पुष्पा जैन यांनी तपोवन वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचे प्रकरण उजेडात आणले. प्रशासनाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुलींचे वसतिगृहातून अन्य ठिकाणी स्थानांतरण केले आहे.

महिला पत्रकाराने दाखवलेल्या धाडसाला जिल्हाधिकारी गित्ते यांनी दाद दिली असून, याबाबत जैन यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला जाणार आहे