आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार शिक्षकांच्या शाळेवर दोन मुख्याध्यापक नियुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - गणेशपूर येथील चार शिक्षक असलेल्या जिल्हा परिषद शाळेचा प्रभार दोन मुख्याध्यापकांकडे देण्यात आला आहे. वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दोन मुख्याध्यापक देऊन जावई शोधच लावल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.
जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात 65 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी चार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आह़े यातील पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या र्मजीत असलेल्या शिक्षकाची पंचायत समितीच्या गटसंसाधन केंद्रात नियुक्ती करण्यात आली आह़े त्यानंतर उरलेल्या तीन शिक्षकांमधील मंथनवार या शिक्षिकेची कायर पिंपरी येथे वयाच्या 53 व्या वर्षी बदली करण्यात आली आहे. ही बदली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने नियमबाह्य पद्धतीने केली. मुख्याध्यापक पदाचा पदभार जी. एच. आवारी यांच्याकडे सोपवण्यात आला. कायर पिंपरी येथील शाळेवरील कहालकर यांना गणेशपूर येथे नियुक्ती दिली होती़ या संबंधीचे वृत्त दैनिक ‘दिव्य मराठी’मध्ये प्रकाशित होताच पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी खडबडून जागे झाले. बीडीओंनी लगेच मंथनवार यांना गणेशपूर येथे रूजू होण्याचे आदेश दिले, परंतू कहालकर या शिक्षकाला येथेच पूर्ववत केले. त्यामुळे या शाळेत सध्या दोन मुख्याध्यापक कार्यरत आहेत. दोघांकडे शिक्षकांचे उपस्थिती रजिस्टर आहेत. शाळेत आल्यानंतर दोन वेगवेगळ्या बुकावर स्वाक्षरी करत असल्याचे आढळून आल़े दोनही मुख्याध्यापकांशी चर्चा केली असता, दोघांनी मुख्याध्यापकांचा प्रभार स्वत:कडेच असल्याचे सांगितल़े

यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. या प्रकाराकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. गटसंसाधनमध्ये नियमबाह्य नियुक्ती : तालुक्यातील पिंपरीच्या शाळेवरून गणेशपूर येथे बदली करण्यात आलेल्या शिक्षकाची नेमणूक गटसंसाधन केंद्रात करण्यात आली. येथील शिक्षण विभागाने शिक्षकाची र्मजी सांभाळत त्यांची नियमबाह्य नियुक्ती केली. या प्रकाराने गणेशपूर शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शाळा व्यवस्थापन समिती अनभिज्ञ
यासंबंधी प्रभारी गटशिक्षणाधिकर्‍यांना विचारणा केली असता, त्यांनी मुख्याध्यापकाचा प्रभार आवारी यांच्याकडेच असल्याचे सांगितले, तर पूर्वीपासून कार्यरत पदविधर महिला शिक्षिकेला नियमानुसार बदली रद्दचे आदेश गटविकास अधिकार्‍यांनी दिले आह़े या प्रकाराबाबत शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा अनभिज्ञ आह़े