आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण होणार शिक्षक मतदारांचा ‘राजा’?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ज्ञानदान करणार्‍या गुरुजनांच्या मनाचा राजा कोण होणार, याचा फैसला गुरुवारी (ता. 19) होणार आहे. मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील चुरस आता चांगलीच वाढली आहे. पाचही जिल्ह्यांत 44 हजार 888 मतदार असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात 22 मतदान केंद्रे आहेत.
या निवडणुकीत ‘शिक्षक आघाडी’चे प्रा. र्शीकांत देशपांडे, ‘विदर्भ जनसंग्राम’चे शेखर भोयर,‘श्री शिवाजी शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष अँड. अरुण शेळके, काँग्रेस-राष्ट्रवादी सर्मथित प्रकाश तायडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे रामदास बारोटे, भारिप-बमसं सर्मथित प्रा. संतोष हुशे, मावळते आमदार वसंत खोटरे, माजी शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे र्शीकृष्ण अवचार, अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. सुभाष गवई, लोकभारती पक्षाच्या वर्षा निकम, खान गुलाम अहमद अमानुल्ला, यांचा समावेश आहे.
विद्यमान आमदार खोटरे यांना गेल्या वर्षी पदवीधर आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांच्या नुटाचे सर्मथन होते; परंतु यंदा खोटरे यांना बर्‍याच विरोधाचा सामना करावा लागत आहे. गेल्यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नावावर उमेदवार म्हणून ते लढले होते; पण यंदा व्ही. यू. डायगव्हाणे यांनी बारोटे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा खोटरेंच्या अडचणींमध्ये थोडी भरच पडली आहे.

वसंत खोटरे
विदर्भ जनसंग्रामचे भोयर शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रथमच लढवत आहेत. दांडगा जनसंपर्क, आक्रमक आंदोलनं, सतत पाठपुरावा ही त्यांची जमेची बाजू आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांना तगडे आव्हान देणार असल्याचे त्यांनी आपल्या फेरीतील शक्तिप्रदर्शनातून दाखवून दिले. त्यामुळे निवडणूक चुरशीची करणार्‍यांमध्ये त्यांचेही नाव आहे.

शेखर भोयर
पश्चिम विदर्भात सर्वांत मोठे शैक्षणिक नेटवर्क असलेल्या र्शी शिवाजी शिक्षण संस्थेची धुरा अँड. शेळकेंकडे आहे. याच नेटवर्कच्या चांगल्या प्रतिमेचा फायदा अँड. शेळके यांना मिळणार आहे. ‘श्री शिवाजी’ची धुरा हाकताना त्यांनी केलेली अनेक कामे, घेतलेले निर्णय शिक्षकांपुढे आहेत. त्यामुळे अँड. शेळके यांच्याकडेही मतदार मोठय़ा प्रमाणावर आकर्षित होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ‘कांटे की टक्कर’ असणार आहे.

अँड. अरुण शेळके
अमरावती विभागासाठी हे नाव नवे नाही. श्रीकांत देशपांडे आणि अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. संतोष ठाकरे यांना संयुक्तपणे काम करताना अनेकांनी पाहिले आहे. दांडगा जनसंपर्क, महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आक्रमक भूमिका हे देशपांडे यांचे वैशिष्ट्य आहे. शिक्षक आघाडीच्या माध्यमातून त्यांनी पाचही जिल्ह्यांत जनसंपर्काचे जाळे दाट केले.
प्रा. र्शीकांत देशपांडे