आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांनी संघटित व्हावे; शिक्षक नेते रा. ना. पांडे यांनी व्यक्त केले मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘शिक्षकांनी संघटित होऊन काम करणे गरजेचे आहे. त्यानंतरच निवडर्शेणीचा मुद्दा पुढे रेटला जाईल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक नेते रा. ना. पांडे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय सेवानिृत्त शिक्षक संघ यांच्या विद्यमाने गुरुवारी (दि. 5) टाउन हॉल येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थित सेवानिवृत्त शिक्षकांना संबोधित करताना ते बोलत होते. निवडर्शेणीची मागणी अनेक दिवसांपासून रखडली आहे. सेवानिवृत्त शिक्षकांनी त्यासाठी संघटित होऊन एकजुटीने संघर्ष करण्याची संघटित होण्याची वेळ आली आहे. निवडर्शेणी करणे गरजेचे असल्याचेही पांडे यांनी सांगितले. याप्रसंगी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी पी. के. कापडे, सुभाषराव बोडखे, सु. गो. राऊत, भि. बा. वणवे, नानासाहेब विंचुरकर, बाबाराव गुंड, वि. स. बहाळे व आर. जी. काळबांडे उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविक भाषणात देविदास पोलादे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. सेवानिवृत्त शिक्षक संघाला भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण कसे करता येईल, यावर त्यांनी प्रकाश टाकला. गोविंद शेरेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर डी. पी. वानखडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने शिक्षक बांधव उपस्थित होते. या वेळी पुष्पा नेरकर, शिवहरी भोम्बे, रा. दे. धरमठोक, सा. दे. लव्हाळे, बा. रा. वणवे, आर. एस. धुले, रा. ना. रोनवाल, स. दौ. सोंडमारे, रावसाहेब काळे, र. वि. सूर्यकर, गो. सा. कानेकर, गो. बा. शेरेकर, म. शं. काळबांडे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सत्कार करण्यात आलेल्या शिक्षकांना शाल, र्शीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.