अमरावती - शासनाचे निर्देश असतानाही नियुक्ती आदेश मिळाल्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उर्दू माध्यमाच्या १७ शिक्षकांनी २३ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या स्थानिक शाखेचासुद्धा आंदोलनाला पाठिंबा आहे.
प्रतीक्षेतील शिक्षकांच्या एका प्रतिनिधी मंडळाने मंगळवारी (दि. १३) दुपारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेअंती २३ डिसेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली. दरम्यानच्या काळात नियुक्ती आदेश जारी झाल्यास महपालिका प्रशासनािवरोधात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
राज्य शासनाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या या सर्व १७ उमेदवारांना महापालिकेतील रिक्त जागांवर नियुक्त करावे, असे शिक्षण संचालनालयाचे आदेश आहेत. मात्र, मागील चार वर्षांपासून महापालिका टाळाटाळ करत असल्याचे संबंधित उमेदवारांचे म्हणणे आहे. मंगळवारच्या चर्चेदरम्यान आयुक्त अरुण डोंगरे यांनी पुन्हा प्रशासकीय अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. रोस्टर अपडेट नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व्हायचे आहे, आदी कारणे सांगतल्याचे शिक्षकांच्या प्रतिनिधी मंडळाने सांगितले.
अशा अडचणींवर मात करण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेऊन त्यांना नियुक्तीपत्र द्यावे, असे शासनाचेच आदेश आहेत. ही बाब आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यावरही तोडगा निघाला नाही. परिणामी, संबंिधतांनी २३ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाआहे. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ. राजीक हुसेन मुजफ्फर हुसेन, सरचिटणीस मो. गयास मो. हनीफ, मो. नाजीम, मीर मेहंदी अली, जावेद इकबाल जोहर, अमीन अहेमद खान संबंधित शिक्षक उमेदवारही उपस्थित होते.