आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांना मिळणार लवकरच मे महिन्याचे थकित वेतन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्याती लशिक्षकांना लवकरच मे महिन्याचे थकित वेतन मिळणार आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून १४ पंचायत समित्यांना २६ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. प्रलंबित असलेल्या दोनपैकी एका महिन्याचे वेतन मिळणार असल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकाऱ्याने शिक्षकांकडून मे महिन्याचे वेतन करण्याबाबत शुक्रवार, जुलैला पत्र निर्गमित करण्यात आले. जिल्हा परिषदेकडून चालवण्यात येत असलेल्या शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा, माजी शासकीय शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन या निधीतून केल्या जाणार आहे. शालार्थ वेतन प्रणालीनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन केल्या जाते. शासनाकडून नियमित वेळेवर निधी मिळत असताना शालार्थ वेतनप्रणाली अद्ययावत करण्यात आल्याने शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब होतो. शिक्षकांचे वेतन काढण्याची जबाबदारी असलेल्या शालार्थ वेतनप्रणाली पथकदेखील याकडे दुर्लक्ष करते. शिक्षणाधिकारी डॉ. पानझडे यांनी याकडे स्वत: लक्ष घातल्याने शिक्षकांना पूर्वीपेक्षा लवकर वेतन प्राप्त होते. तांत्रिक सुधारणांद्वारे शिक्षकांची चिंता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पंचायत समिती रक्कम
अमरावती२०७७२४२२
भातकुली १७४८८२२०
नांदगाव खंडे. २२६६२३८९
चांदूररेल्वे ११२०८१३३
धामणगावरेल्वे १५४२६९६३
तिवसा १३९९४२१७
चांदूरबाजार १५३२१७४१
मोर्शी १५९८४०७०
पंचायतसमिती रक्कम
वरूड२२४३२५२५
दर्यापूर १८८७८६८९
अचलपूर १७८९१४०९
अंजनगावसुर्जी १०८९३३४७
चिखलदरा २३७४८३०९
धारणी ३८२२५०३२
एकूण२६४९२७४६६
साडेसहा हजार शिक्षक सहभागी
जिल्हापरिषदेंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयात सेवा देणाऱ्यांमध्ये ६५०० शिक्षकांचा समावेश आहे. मे महिन्याचे जुलै महिन्यात मिळाल्याने या ६५०० शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.