आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक, विद्यार्थ्यांनी साधला याेगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- योगाभ्यास आयुष मंत्रालयाने दिलेल्या वेळेला लाभला प्रतिसाद; अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कुटूंबीयही सहभागी
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, संघटनांच्या सदस्यांनी योगासने केली. शाळांमध्ये शिक्षकांनी विविध आसने, प्राणायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समाजावून सांगितले . जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ आयुर्वेद व्यासपीठाच्या वतीने राजापेठ येथील एका मंगल कार्यालयात योगासने करण्यात आली, तर राष्ट्रीय छात्र सेनेच्या एकूण १० हजार ८६१ विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिके केली. राज्य राखीव पोलीस बल शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही विविध आसने केली. सकाळच्या वेळी मैदानावर सुरू असलेल्या पावसाची तमा बाळगता सर्वस्थरातून योगदिनाला प्रतिसाद लाभला.
अमरावती पोदारइंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. क्रीडा प्रशिक्षक नंदकिशोर खडसे श्रीधर वाकोडे यांनी वार्मिंग अप एक्सरसाईज घेतल्यानंतर ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, अर्धउष्ट्रासन, शशांकासन ही आसने करून घेतली. याशिवाय प्राणायाम क्रीडा शांतीपाठही घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुधीर महाजन होते. योग हे शरीर रोगाचेच नव्हे तर मानस रोगाचीही उपचार पद्धती असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एनसीसीच्या १०, ८६१ विद्यार्थ्यांनी केला योग
अमरावती- नुकत्याचझालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनी राष्ट्रीय छात्र सेना गट मुख्यालय अमरावतीच्या एकूण १० हजार ८६१ विद्यार्थ्यांनी पावसाची तमा बाळगता एचव्हीपीएम अमरावतीसह िजल्ह्यातील ४४ ठिकाणी तसेच यवतमाळ, अकोला, खामगांव, आणि जळगांव येथे योगासने करून सर्वांनाच आरोग्य कायम ठेवाचे असेल तर योगसाधना करा असा संदेश दिला.
आयुष मंत्रालयाने दिलेल्या वेळेत सकाळी ते ७.३३ या वेळेत योग, प्राणायाम कपालभाती क्रीया केली. या दिवसासाठी सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांनी काळी पॅन्ट पांढरे टी शर्ट असा पोशाख घातला होता. अमरावती येथे हजार ६०० मुले मुलींनी राष्ट्रीय छात्र सेना गट मुख्यालय अमरावतीचे कमांडर ब्रिगेडियर आय.जे.एस.हुंडल अन्य वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योगक्रीया केल्या.
एसआरपीएफचा योगाभ्यास
अमरावती | राज्यराखीव पोलीस बल (एसआरपीएफ)गट क्र. च्या जवानांनी उत्स्फूर्तपणे योगासनं केली. तत्पूर्वी वंदे मातरम योग प्रसारक मंडळाच्या सहकार्याने १८ जूनपासून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोज सकाळी साडेसहाला गटातील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांनी शिबिराचा लाभ घेतला. योगामुळे तणाव दूर होण्यास मदत होते तसेच स्मरणशक्ती, श्वसन क्रीडा सशक्त बनते. थकवा, डोकेदुखी, उच्च रक्तदाब या आजारांवर योग गुणकारी असल्याची माहिती गटाचे समादेशक जे.बी.डाखोरे यांनी दिली. या कार्यक्रमाला सहायक समादेशक एन.एन.सोळंके, समादेशक सहायक जे.बी.कोचर, आदी उपस्थित होते.
अमरावती जागितकयोगदिनानिमित्त आयुर्वेद व्यासपीठ जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाद्वारे राजापेठ येथील अनंत मंगल कार्यालय येथे योगासन प्रात्यक्षिक प्रशिक्षण सकाळी ते या वेळेत झाले.डॉ . अतुल आळशी हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते.

१५० जणांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जनार्दनस्वामींचा सहवास डॉ. आळशी यांना लाभला होता. त्यासंदर्भातील आठवणी डॉ. आळशी यांनी कथन करून सर्वांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. मोहिनी जोशी यांनी जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाची तसेच डॉ. संगिता रिठे यांनी आयुर्वेद व्यासपीठाची माहिती करून दिली. औषधांना दूर ठेवायचे असेल तर नियमितपणे योगासनं करा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुनील कडू यांनी केले. डॉ. चारुस्मिता शहा यांनी मधुमेह मुक्त भारत अभियानाची माहिती दिली. प्रोजेक्टरच्या आधारे मकरंद जोग रक्षा सांभारे या योगशिक्षकांनी प्रात्यक्षिक करून उपस्थितांना सहाय्य केले. कार्यक्रमाचे संचालन अतुल चव्हाण यांनी केले.
आयुर्वेद व्यासपीठ, जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी महिला, पुरूष
बातम्या आणखी आहेत...