आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्नोसॅवी तरुणाईला घातली नव्या अँपने भूरळ, भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केलेले अँप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- काहीही करून आपल्या मोबाइलमध्ये भक्कम बॅलन्स असावा, यासाठी तरूणाईचा आटापिटा सुरू असतो. बॅलन्स कायम रहावे, ते वाढावे म्हणून सातत्याने धडपडणार्‍यांना आता नवीन ‘हाइक’ मिळाली आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या एका मेसेंजर अँपने सध्या अमरावतीच्या तरूणाईलाच नव्हे तर स्मार्ट फोन वापरणार्‍या प्रत्येकाला भूरळ घातली आहे. भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केलेले हे अँप डाऊनलोड करून त्याची लिंक आपल्या मित्रांना पाठवल्यास मोबाइल रिचार्जसाठी बर्‍यापैकी रक्कम मिळते. त्यामुळे सध्या केवळ तरूणाईच नव्हे तर स्मार्ट फोन वापरणारे अनेक जण एकमेकांना या मेसेंजरवर या असे आमंत्रण (इनवाइट) देणारे एसएमएस पाठवत आहे.
गुगल अँप स्टोअर वर येणार्‍या कोणत्याही नव्या अँपची सर्वाधिक चर्चा तरूणाईत असते. त्यामुळे सहाजिकच हे नवीन मेसेंजर अँपही तरूणाईमुळेच कमी वेळात व्हायरल झाले आहे. हे अँप डाउनलोड केल्याने मोबाइल मधील डाटा आपोआप डिलिट होतो. हे अँप आपल्या मोबाइल मधील सर्व माहिती हॅक करून घेते, अशा अफवाही टेक्नो विश्वात आहे. परंतु त्यात कोणतेही तथ्य आढळत नाही, असे अमरावतीच्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर्सने नमूद केले. त्यामुळे सध्या तरी या मेड इन इंडिया मेसेंजरने अनेक प्री-पेड आणि पोस्ट पेड मोबाइल ग्राहकांच्या बॅलन्सला चांगलीच हाइक दिली आहे. त्यामुळे यावर कॉलेजीयन्स तरुणाईच्या उड्या पडत आहेत. तंत्रज्ञान वापरात वाक् बगार फायदा घेत आहेत.