आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान बदलामुळे विषाणुजन्य तापाची साथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत बोचरी थंडी आणि दिवसा उन्हाची काहीली असा वातावरणातील बदल गेल्या काही दिवसांपासून अमरावतीकर अनुभवत आहेत. तापमानातील चढ-उतारामुळे दोन वर्षांखालील मुलांमध्ये विषाणुजन्य तापाची साथ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांची प्रकृती सांभाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मागील आठवड्यापासून तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे डायरिया, सर्दी-खोकला, ताप, न्यूमोनिया या आजारांचे प्रमाण लहान मुलांमध्ये वाढले आहे. दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना बदलत्या वातावरणाचा अधिक त्रास होत असून, पाच दिवसांत सुमारे 50 रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले आहेत. विषाणुजन्य तापाचे 25 रुग्ण दररोज या ठिकाणी उपचार घेत आहेत. लहान मुलांची अशा वातावरणात अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे
अशी घ्या काळजी
थंडीपासून मुलांचा बचाव करावा.
लहान मुलांना गरम कपड्यांनी पुरेपूर झाकून घ्यावे.
घरातील रुग्णांपासून मुलांना दूर ठेवावे.
बाळाची आई आजारी असल्यास तत्काळ उपचार घ्यावा.
आहारात थंड, आंबट पदार्थ टाळावे.
जास्त त्रास जाणवल्यास डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत.
तीव्र ऊन टाळावे
थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी मुलांना उन्हात बसवले जाते. मात्र, मुलांच्या कोमल त्वचेला उन्हामुळे ‘सन बर्न’ हा त्वचेचा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तीव्र ऊन असेल, तर लहान मुलांना थेट सूर्यप्रकाशात बसवणे टाळावे. हवामान बदलाचा कालावधी संपेपर्यंत काळजी घ्यावी. डॉ. हृषीकेश नागलकर, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय