आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबर महिन्यातच बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वातावरणातील आद्र्रतेत झपाट्याच्या बदलांमुळे अमरावतीत उकाडा वाढला आहे. मागील दोन आठवड्यांपासून हवामानात हा बदल झाला असून, भारतीय हवामान विभागाच्या नागपूर वेधशाळेने हे बदल नोंदवले आहेत.

वातावरणात उष्णता, पाणी, वाफ यांचे प्रमाण संतुलित असणे गरजेचे असते. तापमानात वाढ झाली आणि वातावरणातील ओलावा कमी झाला, की उकाडा जास्त जाणवतो. असाच बदल गेल्या आठवडाभरापासून अमरावतीत झाला आहे. मुंबईत नेहमीच असा उकाडा जाणवतो. बाष्पीभवनामुळे समुद्रातील पाण्याची वाफ होऊन ती हवेत मिसळते. त्यामुळे हा परिणाम होतो. विदर्भात वातावरणातील हा बदल मुंबई, पुण्यापेक्षा तुलनात्मकरीत्या कमी असतो. मात्र, पावसाने विसावा घेतल्यानंतर दररोज अचानकपणे आद्र्रतेत मोठय़ापैकी तफावत नोंदवली जात आहे.