आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानाने मोडला चक्क तीन वर्षांचा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- रविवारसोमवार (२८ २९ जून) या दोन दिवसांतील उष्णतेने बऱ्यापैकी उचल घेतली असून, काल-आजच्या तापमानाने गेल्या तीन वर्षांतील विक्रम मोडीत काढले आहेत. २०१२ चा अपवाद सोडला, तर हा विक्रम सलग पाच वर्षांवर जाऊन पोहोचतो, अशा स्थानिक जलविज्ञान केंद्राच्या नोंदी आहेत.

रविवार सोमवारी शहरात प्रचंड उकाडा जाणवला. अगदी उन्हाळ्यात तापावे, असे कोरडे उन्ह तापले होते. सूर्य आग ओकतो की काय, असे जाणवत होते. त्यामुळे पादचाऱ्यांसह प्रत्येक वाहनधारक झाडे, उड्डाणपूल, दुकाने आदींची सावली बघूनच मार्गक्रमण करत होता. रविवारी (दि.२८) शहराचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्याचवेळी २९ जूनचे तापमान त्याहूनही एकने जास्त ३७ अंश सेल्सिअस होते. दोन्ही दिवसांचे हे आकडे गेल्या तीन वर्षांतील याच तारखांतील आकड्यांपेक्षा भिन्न असून ते सहा ते सात अंश सेल्सिअसने अधिक आहे.
दरवर्षीचा वाढता आलेख
गेल्यातीन वर्षांतील २८ २९ जूनचे आकडे तपासले तर तापमानाचा आलेख सलग वाढत गेला आहे. २०१३ साली या दोन्ही वसांचे तापमान अनुक्रमे २९.८ ३१ अंश सेल्सिअस होते. त्यापुढच्या वर्षी ते अनुक्रमे ३३ ३४.६ अंश सेल्सिअस तर २०१५ साली ३६ ३७ अंश सेल्सिअस असे नोंदले गेले. यावरून जूनअखेरचे तीन दिवस तापमानाच्या उच्चांकाचे राहतात, असे दिसून येते.

दिव्य मराठी विशेष
(आकडे अं.से. मध्ये)
२७ जून
२८ जून
असे बदलत गेले पाच वर्षांतील तापमान
२९ जून २०१५
वर्ष २७ २८ २९
२०१४ ३९.८ ३३ ३४.६
२०१३ २८ २९.८ ३१
२०१२ ३७.४ ३६.५ ३६
२०११ ३१ ३१ ३३
बातम्या आणखी आहेत...