आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधान,पुसल्याला वादळाचा तडाखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-वरुड मान्सूनपूर्व पाऊस व वादळाने बुधवारी रात्री जबर तडाखा दिल्याने माधान व पुसला येथील घरे, संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले. वादळात जीवितहानी झाली नसली, तरी मोठय़ा प्रमाणात झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यात इतर ठिकाणीही वादळामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
पुसला (ता. वरुड) येथे बुधवारी (दि. 11) रात्री आठच्या सुमारास जोराच्या वादळासह पावसाने हजेरी लावली. तब्बल एक ते दीड तास झालेल्या सुसाट वारा वाहत होता. परिणामी, गावकरी भयभीत झाले होते. गावकरी घराबाहेर आल्यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे. वादळामुळे अनेक घरांवरची टिनपत्रे उडून गेली. अनेक ठिकाणी विजेचे व दूरध्वनीचे खांब कोलमडल्याने व वीज तारा तुटल्याने रात्रभर वीजप्रवाह व दूरध्वनीसेवा खंडित होती. वादळामुळे अनेक नागरिक बेघर झाले. प्रभात हायस्कूलवरील टीनपत्रे पालापाचोळ्यासारखे उडून गेले व झाडांवर अडकले. झाडे कोसळल्याने अनेक घरांची मोडतोड झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या भिंत व संरक्षक भिंतीवर झाड कोसळल्याने इमारतीचे प्रचंड नुकसान झाले. वीजप्रवाह रात्रभर खंडित झाल्याने नागरिकांना रात्र उकाड्यात काढावी लागली. भयभीत झालेल्या नागरिकांनी त्वरित घर सोडून मोकळ्या जागेचा आर्शय घेतल्याने जीवितहानी टळली. तहसीलदार राम लंके यांनी तलाठय़ासह भेट देऊन नुकसानग्रस्तांची पाहणी केली. वादळ पीडितांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी रमेश र्शीराव, रत्नाकर अहेर, सचिन वायकुळ, राजू भागवतकर, संजय र्शीराव, प्रदीप बिबे, दीपक काळे आदी गावकर्‍यांनी केली.