आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीचशेवर क्रिकेटपटूंची घेतली निवड चाचणी, १६-१९ वर्षांखालील वयोगटासाठी चाळणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे (व्हीसीए)अन् जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने अमरावती येथील एचव्हीपीएम क्रिकेट स्टेडियमवर ११ १२ रोजी जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमधील क्रिकेटपटूंची निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातून निवडले जाणारे क्रिकेटपटू व्हीसीएतर्फे आयोजित १७ दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक अश्विन जवादे यांच्याकडून प्रशिक्षण घेतील.
१६ १९ या दोन्ही वयोगटांसाठी प्रत्येकी ३० खेळाडूंची निवड केली जाणार असून त्यातून १५-१५ खेळाडूंचा संघ निवडला जाणार आहे. या १५ खेळाडूंच्या दोन्ही गटांमधून काही दर्जेदार खेळाडूंची निवड व्हीसीए त्यांचा अकादमीसाठी करणार असल्याचे जवादे यांनी सांगितले. या निवड चाचणीला जिल्ह्यातील २५० च्या वर क्रिकेटपटूंनी हजेरी लावली. यात तालुका क्रिकेट संघटना, शहरातील विविध क्लबच्या खेळाडूंचा समावेश होता. अमरावती, दर्यापूर, अंजनगांव सूर्जी, चांदूर रेल्वे, अचलपूर, मोर्शी, चिखलदरा, भातकुली आणि नांदगांव खंडेश्वर येथून किमान १० तरी खेळाडू चाचणीला उपस्थित राहिले. अमरावती शहरातील १५० च्या वर खेळाडूंनी चाचणीला हजेरी लावली. क्रिकेटपटूंची चपळता, शारीरिक क्षमता, कौशल्य, संयम, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजीचे निरीक्षण करून खेळाडूंची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली जाणार असल्याची माहितीही अश्विन जवादे यांनी दिली.
जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे सचिव आणि एचव्हीपीएम क्रिकेट क्लबचे मुख्य प्रशिक्षक प्रा. दिनानाथ नवाथे, सहायक प्रशिक्षक सागर तंबोली, रणजीपटू राहुल चिखलकर, आशिष सोळंके, महेश बुंधाडे यांनी चाचणीदरम्यान अश्विन जवादे यांना सहकार्य केले.
व्हीसीएतर्फे पाठवण्यात आलेले प्रशिक्षक माजी विद्यापीठ क्रिकेटपटू अश्विन जवादे हे अनेक वर्षांपासून संघटक म्हणूक काम करीत असून त्यांना मुंबईतील संघांना प्रशिक्षण देण्याचाही सराव आहे. या शिबिरात खेळाडूंची वर्तणूक, कौशल्य, मानसिक सुदृढता आणि शारीरिक तंदुरुस्ती या चार पात्रता निकषांच्या आधारे निवड केली जाईल.
दोन्ही गटांसाठी करणार १५ खेळाडूंची निवड
१६१९ वर्षांखालील गटाच्या निवड चाचणीद्वारे ३०-३० खेळाडूंची निवड होईल. जे खेळाडू व्हीसीएच्या पात्रता निकषात बसतील त्या प्रत्येकी १५ खेळाडूंच्या संघांची १३ ते ३० मे दरम्यान क्रिकेट स्टेडियमवर आयोजित दोन्ही वयोगटाच्या सराव शिबिरासाठी निवड होईल. व्हीसीएतर्फे आलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मते दोन्ही गटातील उत्तम क्रिकेटपटूंची बीसीसीआयतर्फे नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर चालवल्या जाणाऱ्या क्रिकेट अकादमीसाठी निवड केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...