आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TET ची संभाव्य उत्तरपत्रिका जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यातील सरकारी व खासगी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी अनिवार्य केलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (दि. 15) घेण्यात आली. सात दिवसांनंतर सोमवारी (दि.23 ) टीईटीची संभाव्य उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. त्याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास 30 डिसेंबरपर्यंत त्यांना ते नोंदवता येणार आहेत, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. र्शीराम पानझाडे यांनी सांगितले.
या परीक्षेत 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे उमेदवार शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली सीईटी देऊ शकतील.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून सोमवारी टीईटी परीक्षेची संभाव्य उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली होती. या वेळी इंग्रजी, मराठी माध्यमांची एक आणि उर्दू माध्यमाच्या प्रश्‍न पत्रिकेची एक अशा दोन प्रकारच्या उत्तरपत्रिका जाहीर झाल्या आहेत. याच वेळी डीटीएड पदविकाधारक परीक्षार्थ्यांसाठी पेपर-वन आणि बी.एड. पदवीधरांसाठी पेपर-टू अशा वेगवेगळ्या उत्तरपत्रिका ‘महाटीईटीहेल्पलाईन डॉट ईन’ या संकेत स्थळावर पाहता येईल. या उत्तरपत्रिकांबाबत आक्षेप ‘महाटीईटीहेल्पजीमेल डॉट कॉम’वर 30 डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील 21 हजार 633 उमेदवारांनी टीईटी दिली होती. यामध्ये 14 हजार 190 डी.एड. परीक्षार्थी, तर 7 हजार 443 बी.एड. परीक्षार्थी होते.
ही परीक्षा शिक्षण विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या धर्तीवरच पहिल्यादांच घेण्यात आली. ज्या प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यापूर्वी संभाव्य उत्तरसूची जाहीर करून आक्षेप मागवतो, त्याच प्रमाणे टीईटीसाठी आक्षेप मागवण्यात आले आहेत. उमेदवारांकडून आक्षेप आल्यानंतर त्यांची तज्ज्ञांकडून पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर लवकरच अंतिम उत्तरसूची आणि निकाल जाहीर होणार आहेत.
भावी शिक्षकांना आता ‘सीईटी’चे वेध
सरकारने प्रथमच अनिवार्य केलेली ‘टीईटी’ देताना परीक्षार्थींच्या बुद्धिमत्तेचा कस लागला होता. ही परीक्षा उत्तीर्ण होणा- या उमेदवारांना संभाव्य ‘सीईटी’ला सामोरे जाताना आपली बौद्धिक पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. राज्यात डीटीएड आणि बीएड् पदवीधारकांची संख्या लाखोंच्या घरात वाढली आहे. या सर्वांना नोकरी देणे शासनाला शक्य नाही. त्यामुळेच चाळणी लावण्यासाठी यावर्षी डी.एड. आणि बी.एड.धारकांची ‘टीईटी’ घेण्यात आली. या परीक्षेची संभाव्य उत्तरपत्रिका सोमवारी जाहीर झाली. लवकरच अंतिम उत्तरपत्रिका आणि निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर ‘टीईटी’मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणा- या उमेदवारांना ‘सीईटी’ द्यावी लागणार आहे.
महाराट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे जाहीर केलेली पहिल्या पेपरच्या शंभर प्रश्नांची संभाव्य उत्तर पत्रिका (उर्वरित संभाव्य उत्तरसूची संकेतस्थळावर उपलब्ध आहे.