आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात उद्या शाळाबाह्य बालकांची शोध माेहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शालेय शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये म्हणून शासनाकडून शनिवार जुलै रोजी शाळाबाह्य बालकांचा सर्वे केल्या जाणार आहे. जिल्ह्यात सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले असून १६२७ गावांमध्ये लाख ९८ हजार ११० घरापर्यंत एकाच दिवशी सर्वेक्षण पोहचणार आहे. शिक्षकांसह सर्वच सरकारी कर्मचारी या अभियानात सहभागी होणार आहे.
शाळाबाह्य बालकांची शोध मोहिम राबवण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहे.
शाळाबाह्य बालकांची अचूक माहिती समोर यावी म्हणून ही शोध माेहिम राबवण्यात येणार आहे. शिक्षण, महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय विशेष सहाय्य, महिला बालकल्याण, अल्पसंख्यांक विभाग आरोग्य विभागांचे सहकार्य आणि समन्वयातून सर्वेक्षण केले जाणार आहे. शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण सकाळी ते सायंकाळी या वेळेत केले जाणार आहे.

सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान प्रचलित मतदान केंद्रनिहाय सर्वेक्षक दिला जाणार आहे. यासाठी बीएलओ तसेच जनगणनेसाठी उपलब्ध प्रगणकांची मदत घेतली जाणार आहे. सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा तसेच कार्यक्रमाचे नियोजन करता यावे म्हणून १२ जून ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, शासकीय कामगार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गट शिक्षणाधिकारी आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शिवाय पंचायत समिती स्तरावर देखील सर्वेक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विविध ठिकाणी घेतले जात आहे. तळागाळातील बालक शाळेत यावे, शिकावे या महत्वाच्या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे.
१६२७ गावांमध्ये एकाच दिवशी राबवणार व्यापक अभियान
शालेयशिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये म्हणून शासनाकडून शनिवार जुलै रोजी शाळाबाह्य बालकांचा सर्वे केल्या जाणार आहे. जिल्ह्यात सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले असून १६२७ गावांमध्ये लाख ९८ हजार ११० घरापर्यंत एकाच दिवशी सर्वेक्षण पोहचणार आहे. शिक्षकांसह सर्वच सरकारी कर्मचारी या अभियानात सहभागी होणार आहे.
शाळाबाह्य बालकांची शोध मोहिम राबवण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहे. शाळाबाह्य बालकांची अचूक माहिती समोर यावी म्हणून ही शोध माेहिम राबवण्यात येणार आहे. शिक्षण, महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय विशेष सहाय्य, महिला बालकल्याण, अल्पसंख्यांक विभाग आरोग्य विभागांचे सहकार्य आणि समन्वयातून सर्वेक्षण केले जाणार आहे. शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण सकाळी ते सायंकाळी या वेळेत केले जाणार आहे.

सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान प्रचलित मतदान केंद्रनिहाय सर्वेक्षक दिला जाणार आहे. यासाठी बीएलओ तसेच जनगणनेसाठी उपलब्ध प्रगणकांची मदत घेतली जाणार आहे. सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा तसेच कार्यक्रमाचे नियोजन करता यावे म्हणून १२ जून ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, शासकीय कामगार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गट शिक्षणाधिकारी आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शिवाय पंचायत समिती स्तरावर देखील सर्वेक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विविध ठिकाणी घेतले जात आहे. तळागाळातील बालक शाळेत यावे, शिकावे या महत्वाच्या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे.
असे आहे नियोजन
तालुकागाव घर सर्वेक्षक झोनल नियंत्रक अधिकारी अधिकारी
अचलपूर १७१ ५८८१७ ५९३ ३९
अमरावती(ग्रा.) १०७ ३१४१९ ३४१ १५
अंजनगाव सुर्जी १०५ ३६३५५ ३९६ २०
भातकुली ८८ २७००० २८१ १५
चांदूर बाजार १३७ ४४५९८ ४७६ २४
चिखलदरा १६८ २२०२८ २७९ १५
चांदूर रेल्वे ७३ २४५४४ २७१ १३
दर्यापूर १२७ ४१५२७ ४१३ २३
धारणी १५२ ३५५९६ ४६१ २०
धामणगाव रेल्वे ७८ ३२२४४ ३३० १८
मोर्शी ८७ ३९१६६ ४१३ २१
नांदगाव खंडे. १६१ ३२५८१ ३५८ १३
तिवसा ७० २२९४८ २५७ १३
वरुड १०३ ४९२८७ ४७९ ३४
एकूण १६२७ ४९८११० ५३४८ २८७ १८