आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य जाणार आज पृथ्वीपासून सर्वाधिक दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सरासरीदर वर्षाला जुलै रोजी पृथ्वी-सूर्य हे अंतर सर्वाधिक असते. या घटनेला खगोलशास्त्रात अेपीहेलिऑन (अपसूर्य) असे म्हणतात. पृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी १५ कोटी किलोमीटर आहे. या अंतराला खगोलशास्त्रात एक खगोलीय एकक, असेसुद्धा म्हणतात. जुलै रोजी पृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी १५२ दशलक्ष किलोमीटर राहणार आहे. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असते. या दिवसात दरवर्षाला थोडा फरक पडू शकते, अशी माहिती खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून, यामध्ये हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र चालू असते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळते. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलियम बनते. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तूमानाचे रूपांतर सौर ऊर्जेमध्ये होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते.

या डागाचा शोध १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला. या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी २००८ पासून २४ वे चक्र सुरू झाले. मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होतो.
दर लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे सेंटिमीटर आेढली जात आहे. खंडसुद्धा हळूहळू सरकत अाहे. परिणामी, न्यूयॉर्क शहर हे लंडनपासून दरवर्षाला २.५ सेंटिमीटर दूर जात आहे.वाढती लोकसंख्या पर्यावरणाचा विनाश कारणीभूत असल्याचे गिरुळकर यांनी सांगितले.
अब्ज वर्ष
अब्ज वर्षाने सूर्याचा मृत्यू
सूर्याचे आयुष्य
सूर्य
पेरीहेलिऑन
अेपीहेलिऑन
सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्ष
सूर्याचेवय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर आॅर्थर एडिग्टन आहे. सूर्याचे एकूण आयुष्य १० अब्ज वर्ष आहे. अब्ज वर्ष संपले असून, आणखी अब्ज वर्षाने सूर्याचा मृत्यू श्वेत बटू ताऱ्यामध्ये होईल. सूर्यावरून कधीकधी चंुबकीय लहरी फेकल्या जातात. यामुळेच चुंबकीय वादळे येतात. सन १८५९ मध्ये हे वादळ आले होते. यामुळे जगातील टेलिग्रॉफ यंत्रणा बंद पडली होती. या वादळाला केरीग्टन इव्हेंट हे नाव दिले गेले होते. या वादळामुळे सँटेलाइट, जीपीएस यंत्रणा पूर्णपणे बंद पडत असल्याचे गिरुळकर यांचे म्हणणे आहे.
साध्या डोळ्याने सूर्याकडे पाहणे धोकादायक
४जुलै रोजी पृथ्वी-सूर्य हे अंतर जास्त असल्याने या खगोलीय घटनेचा संपूर्ण सजीव सृष्टीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. परंतु, उत्सुकतेपोटी एखाद्याने सूर्याकडे सरळ साध्या डोळ्याने पाहण्याचा केलेला प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. विजयगिरुळकर, हौशी खगोल अभ्यासक.
दिव्य मराठी विशेष