आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमाल घसरला, तूर ६०० तर हरभरा ३०० रुपयांनी गडगडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दोन आठवड्यापुर्वी तुर आणि हरभऱ्याला आलेले चांगले दिवस औटघटकेचे ठरले असून सध्या तुर हरभऱ्याच्या भावात कमालीची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. तुरीच्या भावात सरासरी ६०० तर हरभऱ्याच्या भावात सरासरी ३०० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या औटघटकेच्या वातावरणावर विरजण पडले आहे. सोयाबीनचे भाव अद्याप सरासरी चार हजार रुपयांवर स्थिर आहेत.
दोन आठवड्यांपुर्वी तूर, हरभऱ्याच्या भावात झालेली वाढ सध्या भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांसाठी क्षणभंगूर ठरली आहे. दोन आठवड्यांपुर्वी तुरीचे दर सरासरी ७६०० रुपयांवर तर हरभऱ्याचे दर ४९०० रुपयांवर गेले होते. यावर्षी उत्पादनात घट झाल्याने मिळणारा भाव समाधानकारक होता. त्याताच हरभरा तुरीचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. उत्पादन घटल्यामुळे मागील काही दिवसांत हरभरा, तुरीसह सोयाबीनच्या दरात चांगली वाढ झाली होती. या भाववाढीचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होत होता. वाढीव दरामुळे बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी खतांचा खर्च यामुळे भागणार होता, परंतु आता त्यालाही फटका बसण्याची शक्यता आहे.

अद्यापही बँकांचे कर्जवाटप सुरू झाल्यामुळे ही भाववाढी शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरली होती. परंतु चार ते पाच दिवसांपासून शेतमालाची आवक कमी असूनही जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुर, हरभरा या प्रमुख पीकांचे दर कोसळले आहेत. हरभऱ्याला सरासरी ४५०० तर तुरीला सरासरी हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती आज तुरीला किमान ६५०० तर कमाल ७२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सोयाबीनला किमान ३५०० तर कमाल ४१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजार समित्यांमध्ये सध्या शेतमालाची किरकोळ आवक सुरू असून येथील बाजार समितीत आज तुरीच्या १५३२, हरभरा १३९४ तर सोयाबीनच्या ३०४८ पोत्यांची आवक झाली.
दर्यापुरात हरभरा ५,०८० रुपयांवर
दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक घटली असून सोमवारी (दि. ११) केवळ ४२४ क्विंटलची आवक झाली. महिनाभराच्या तुलनेत हरभऱ्याच्या कमाल भावात ५०० रुपयांची घवघवीत वाढ झाली. संध्या तूर, हरभरा सोयाबीनची आवक मंदावली आहे.
सोमवारी बाजार समितीत तुरीच्या केवळ ४२० पोत्यांची आवक झाली. तुरीला किमान ४८०० तर कमाल ७२५० रुपयांचा भाव मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत तुरीचे भाव साडे चारशे रुपयांनी घटले असल्याचे चित्र बाजारात दिसून आले. हरभऱ्याला किमान ३००० तर कमाल ५०८० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सोयाबीन किमान ३८०१, तर कमाल ४०६० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून एकूण १५१ पोत्यांची आवक झाली. तूर, हरभरा सोयाबीनच्या कमाल भावात सुधारण झाल्यामुळे अर्थ चक्र काहीसे सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ठोकमध्ये घसरले भाजीपाल्याचेही दर...
बातम्या आणखी आहेत...