आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकांना येणार 'अच्छे दिन', थकित वेतन लवकरच मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे मागील दोन महिन्यांपासून रखडलेले वेतन लवकरच मिळणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिक्षकांच्या वेतनाची २६ कोटी १० लाख रुपयांची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषकडे वळती करण्यात आली असून, बँकेमार्फत पंचायत समित्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर शिक्षकांना वेतन मिळणार आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, केंद्रीय प्राथमिक शाळा, माजी शासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्च एप्रिल महिन्याचे वेतन रखडले होते. दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. वेतन नसल्याने भविष्य निर्वाह निधी, विविध कर्जांचे हप्ते, एलआयसीदेखील रखडली होती. त्यावरील व्याजाचा भुर्दंडदेखील शिक्षकांच्या वेतनावर पडणार असल्याने शिक्षक संघटनादेखील आक्रमक झाल्या होत्या. काही शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेत प्रलंिबत वेतन देण्याची मागणी केली होती. तत्काळ वेतन दिल्यास आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून शिक्षकांच्या वेतनासाठी २६ कोटी १० लाख २८,८३१ रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषच्या कॅम्प शाखेत हस्तांतरित करण्यात आली.
जिल्ह्यातील चौदा पंचायत समितीच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्याबाबतदेखील जिल्हा परिषदेकडून सोमवारी (२५ मे) पत्र देण्यात आले. पंचायत समित्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा झाल्यानंतर शिक्षकांना वेतन हाती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मागील दोन महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत असलेल्या शिक्षकांनादेखील वेतन जमा झाल्याने दिलासा मिळणार आहे.
पुढील स्लािडवर क्लिक करून वाचा, जमा केलेली रक्कम...
बातम्या आणखी आहेत...