आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बीलाही तडाखा! ५८ टक्के क्षेत्रातच झाल्यापेरण्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -जिल्‍ह्यातरब्बीच्या पेरण्या रखडतच सुरू असून कमी पावसामुळे आतापर्यंत केवळ ५८.६२ टक्के पेरण्या होऊ शकल्या. सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याचे असले तरी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्म्याहून अधिक घट झाली आहे. दरम्यान, हरभऱ्याचे क्षेत्र कमी असून कमी ओलाव्यामुळे यावर्षी उत्पादनही कमालीचे घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षीजिल्‍ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीने तडाखादिला. सोयाबीनचा सर्वाधिक पेरा राहून उत्पादनही समाधानकारक झाले; परंतु सातत्याने येणाऱ्या पावसामुळे एेन हंगामात सोयाबीन ओले झाल्यामुळे बेभावविकावे लागले होते. परंतु उत्पादन सरासरी सात ते आठ क्विंटल झाल्यामुळे निदान शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तरी भरून निघाला होता. सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असल्यामुळेजिल्‍ह्यात रब्बीचेही क्षेत्र वाढले होते. यात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक होते. दरम्यान, गारपीट, अवकाळी पावसाचा जबर फटका हरभऱ्याला बसला त्यामुळे चांगले उत्पादन होऊनही शेतमाल ओला झाला म्हणून बाजारात बेभाव विकावा लागला होता. दरम्यान, बहुतांश सोयाबीन ओले झाल्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या बियाणांची टंचाई निर्माण झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली होती. त्यामुळे कपाशीचे क्षेत्र वाढले होते. सोयाबीनच्या पिकात आंतरपीक म्हणून तुरीचीही पेरणी करण्यात आली होती. यामुळे यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात घट झाली.जिल्‍ह्यात रब्बी हंगामात हरभरा प्रमुख पीक आहे.

हरभऱ्याचा सर्वाधिक पेराजिल्‍ह्यात दर्यापूर तालुक्यात असतो. सध्या हरभरा पेरणीची वेळ निघून गेल्यामुळेजिल्‍ह्यात आतापर्यंत ६९ हजार १६२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे हरभऱ्याच्या क्षेत्रात फारशी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे कृषीविभागाचे म्हणणे आहे. कमी पावसाचा तडाखा खरिपातील सर्वच पिकांना बसला असताना याची गंभीर झळ रब्बीच्याही पिकांना बसण्याची शक्यता आहे.
हरभरा, गव्हाच्या क्षेत्रामध्येकमालीची घट
ज्या कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी आतापासूनच हरभऱ्याचे सिंचन सुरू केलेय. कमी ओलाव्याअभावी पीक समाधानकारक दिसत नसल्यामुळे आतापासूनच पाण्याची पाळी सुरू करावी लागली आहे. हरभऱ्याच्या फुलोऱ्याला सुरवात झाल्यानंतर पाण्याची पाळीदिली जाते. परंतु, पिकासाठी शेतकऱ्यांना आतापासून प्रयत्न करावे लागत आहे.
गहू करडईचेही क्षेत्रघटले
जिल्‍ह्यातमागील वर्षी एकूण ४० हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली. यात सर्वािधक पेरा ८८३४ हेक्टर धामणगाव रेल्वे तालुक्यात होता. त्यानंतर धारणी तालुक्यात ७८१० हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. परंतुजिल्‍ह्यात यावर्षी गव्हाच्या पेरणीतही घट होण्याची चिन्हे आहेत. सद्य:स्थितीतजिल्‍ह्यात १६ हजार ९६३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक क्षेत्र धारणी तालुक्यात ३८८० हेक्टर एवढी आहे. त्यानंतर मोर्शी तालुक्यात १२८३ हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.