आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत आणखी एका भूकंपाची शक्यता, आयुक्त चंद्रकांत गुडेवार कायम ‘इन अॅक्शन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बडनेराचे आमदार रवि राणा यांनी मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीमुळे महापालिकेत पुन्हा एका भूकंपाची शक्यता बळावली आहे. मुळात कामकाजात हलगर्जीपणा अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर ही कारवाईची टांगती तलवार कायम असून, कायद्याची चौकट पाळणे अशा स्वरुपाचा गुन्हा संबंधित अधिकाऱ्यांनी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
नगरोत्थानाच्या निधीतील कामे ठरविताना झालेला भेदभाव, नैसर्गिक आपत्तीच्या निधीतून झालेली भलतीच कामे रस्ते खोदकामाच्या भरपाईसाठी रिलायन्सकडून मिळालेल्या रकमेचा दुरुपयोग अशा अनेक मुद्द्यावर मनपाचे संबंधित अधिकारी बैठकीत हतबल होते. आयुक्तांच्या माध्यमातून आमदार राणा यांनी विचारलेल्या बहुतेक प्रश्नांवर ते टोलवाटोलवीची उत्तरे देत होते. त्यामुळे कायदेशीर चौकट का मोडली, हा मुळ मुद्दा उपस्थित करीत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी त्यांना चूप केले. आता हाच मुद्दा पुढे करीत आयुक्तांनी स्वत: सायंकाळपर्यंत विस्तृत अहवाल मागविला असून त्याआधारे ते दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे महापालिकेत पुन्हा एक भूकंप होण्याची शक्यता असून त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचा बळी जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील प्रलंबित कामांची स्थिती जाणून घेण्यासाठी आमदार रवि राणा यांनी मंगळवारी आयुक्तांच्या दालनात आढावा बैठक घेतली. निवडक पदाधिकारी सर्व विभागांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत त्यांनी तब्बल २१ मुद्द्यांवर चर्चा केली. शहरातील मुलभूत समस्यांच्या निराकरणापासून ते स्मार्ट सिटीला पुरक अशा विविध मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश होता.
बैठकीला स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, सभागृह नेते बबलू शेखावत, राकाँचे गटनेते सुनील काळे, जनविकास-रिपाइंचे गटनेते प्रकाश बनसोड, राणा यांचे सहयोगी नगरसेवक अंबादास जावरे संजय नागपुरे, राकाँचे नगरसेवक जयश्री मोरय्या, सपना ठाकूर, प्रशासनातर्फे उपायुक्त विनायक औगड चंदन पाटील, मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे, लेखापाल गोसावी, प्रभारी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, एडीटीपी सुरेंद्र कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, अग्निशमन विभागाचे प्रमुख चव्हाण, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, सहायक आयुक्त राहुल ओगले, मदन तांबेकर, नरेंद्र वानखडे प्रणाली घोंगे, कार्यशाळा अधिकारी पडघन आदी उपस्थित होते.

खापर्डेवाडा ताब्यात घेणार
शहराचे हृदयस्थळ म्हणून ओळख असलेल्या राजकमल चौकातील खापर्डेवाडा ही ऐतिहासिक वास्तू आहे. तिचे पावित्र्य टिकून रहावे म्हणून मनपाने ती ताब्यात घेऊन तिला वारसा म्हणून घोषित करण्याची मागणीही आमदार राणा यांनी केली होती. दरम्यान त्यानुसार कारवाई करणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

खोदकाम एकीकडे तर दुरुस्ती मात्र भलतीकडेच
फोर जीचे जाळे विस्तारण्यासाठी रिलायन्स कंपनीतर्फे अमरावती शहराच्या विविध भागात खोदकाम केले गेले. नियमानुसार ज्या भागात पहिल्यांदा खोदकाम झाले, ते आधी बुजवायला पाहीजे. परंतु मनपाने तसे करता काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे भलतीकडेच दुरुस्ती कार्य केले. सुनील काळे यांनी हा मुद्दा लावून धरला. त्यांच्यामते ज्याठिकाणी खोदकाम नाही, तेथे पैसा वळता करण्यात आला. याऊलट काही ठिकाणचे खोदकाम अजूनही तसेच पडून आहे.
पुढील स्लाइडसवर क्लिक करून जाणून घ्या काय म्हणणे आहे नेत्यांचे आणि बैठकीतील ठळक मुद्दे...
बातम्या आणखी आहेत...