आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन डॉक्टरांनीच केली डॉक्टरला मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात प्लॅस्टिक सर्जन असलेल्या एका ३१ वर्षीय डॉक्टरसोबत याच महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तीन डॉक्टरांनी शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाणीदरम्यान डॉक्टरच्या डोक्यावर जेवणाचा डबा मारल्याने डोक्याला जखम झाली आहे. गुरुवारी पहाटे घडलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तीन डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. विवेक आदित्य गुप्ता (३१, रा. पीडीएमसी क्वार्टर)असे मारहाणीत जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. गुप्ता हे मूळचे दिल्ली येथील रहिवासी असून, पीडीएमसीमध्ये प्लास्टिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा याच महाविद्यालयात एम.डी. ला असलेल्या डॉ. बादल टोनी, डॉ. शंतनू देशमुख आणि डॉ. निकुंज मोदी या तिघांसोबत वाद झाला यातून तिघांनी शिवीगाळ केली. काही वेळ हा वाद थांबला. मात्र, गुरुवारी पहाटे हा वाद उफाळून आला. त्यावेळी डॉ. गुप्तांना या तिघांनी पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने वाद वाढला.
दरम्यान, तिघांनी डॉ. गुप्ता यांचा जेवणाचा टिफिन उचलून त्यांच्या डोक्यावर मारला. यामुळे डॉ. गुप्ता यांच्या डोक्याला जखम झाली. डॉ. गुप्ता यांनी गाडगेनगर पोलिसांत तिन्ही डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

अद्याप तक्रार नाही
- या प्रकरणाची तक्रार अजूनही आम्हाला प्राप्त झाली नाही. पोलिस ठाण्याच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. आमच्याकडे थेट तक्रार नसल्यामुळे या प्रकरणात आमच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
डॉ.दिलीप जाणे, डीन, पीडीएमसी, अमरावती.
बातम्या आणखी आहेत...