आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Written Test For The Post Of Kotwal In Bhatkuli Tivasa

तीन आठवड्यांच्या बाळंतीण आईच्या उराशी कोतवालाचे स्वप्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- किमान कोतवालाची नोकरी मिळून मुलाचे आयुष्य चांगले जावे या एकाच आशेपोटी तीन आठवड्याच्या बाळाला झाडाच्या सावलीत दीड तास आजीच्या कुशीत ठेवून आईने रविवारी (दि. ७) कोतवालाची परीक्षा दिली. तुफान गर्मीत भुकेने व्याकूळ झालेल्या बाळाचा आक्रोश पाहून गहिवरलेल्या केंद्रावरील कर्मचारी पोलिसांनी कुशीत घेऊन बसलेल्या आजीला कुलरचा गारवा देऊन माणुसकीचाही परिचय दिला.
भातकुली तिवसा तालुक्यातील कोतवाल पदासाठी रविवारी (दि. ७) लेखी परीक्षा घेण्यात आली. नांदेडा खुर्द (ता. भातकुली) येथील पुनम मयूर कडू ही वीस वर्षीय महिला रविवारी दहा वाजताच्या सुमारास शहरातील कॅम्प भागातील जि. प. उर्दू माध्यमिक उच्च माध्यमिक कला कन्या शाळेत कोतवाल पदासाठी परिक्षा देण्यासाठी आली होती. पुनमच्या कुशीत तीन आठवड्याचा मुलगा होता. नात सून परीक्षेला जाणार असल्यामुळे पती मयूरची आजी या मुलाचा सांभाळ करण्यासाठी म्हणून परीक्षा केंद्रावर आली होती. दीड तास चालणारी ही परीक्षा अकरा वाजता सुरू झाली. पुनमने मुलाला आजीच्या कुशीत दिले पुनम परीक्षा केंद्राच्या खोलीत निघून गेली.
आजी पंतूला घेऊन एका झाडाच्या सावलीत बसली. पती मयूरही सोबतीला होता. बाळ तीन आठवड्याचेच असल्यामुळे घरच्यांनी गरमी, ऊन असल्यामुळे परीक्षेला जाण्याचाच सल्ला दिला. परंतु मुलाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पुनमने पाहिले होते. पुनमची प्रसुती १६ मे रोजी झाली होती. त्यामुळे वाढती गरमी, उष्ण हवा यामुळे बाळाच्या आरोग्याचाही धोका होता. परंतु किमान कोतवालाची नोकरी मिळाली तरी मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल अशी आशा पुनमला होती.
त्यामुळे घरच्यांचा विरोध जुगारून पुनमने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला पती आजीसोबत ती केंद्रावर पोहचली होती. पुनम पेपर सोडविण्यासाठी गेल्यानंतर आजी आपल्या पंतूला घेऊन एका झाडाच्या सावलीत बसली. मात्र काही वेळानंतर वातावरणात उष्णता वाढली बाळ रडायला लागले. बाळाच्या आक्रोशामुळे परीक्षा केंद्रावरील कर्मचारी पोलिसांनाही माणसुकीचा गहिवर फुटला. मुलाचा आक्रोश पाहून केन्द्रावरील उपस्थित पोलिस अन्य कर्मचाऱ्यांनी त्या आजींना कुलर असलेल्या शाळेतील एका कक्षात बसवले.
कुलरच्या गारव्यामुळे बाळाचे रडणे थांबले. मात्र तासाभरानंतर बाळाला भुक लागल्याने त्याने पुन्हा आक्रोश सुरू केला. परंतु त्याची भूक क्षमविण्यासाठी आता बाळाला आईकडे किंवा आईला बाळाकडे आणणेही शक्य नव्हते. अखेर उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांच्याही भावना अनावर झाल्या. त्यांनी केंद्रावर उपस्थित एसडीएम यांना विनंती केली. त्यांनीही स्तनपानाला परवानगी दिली. त्यानंतर काही वेळानंतर बाळ शांत झाले. बाळ पुन्हा आजीकडे आले ती माता पुन्हा परीक्षेचा पेपर साेडवण्यासाठी गेली. हा प्रकार पाहणाऱ्यांनी त्या मातेचे कौतूक केले. नोकरीची आस ती मिळवण्यासाठी तिने केलेला प्रयत्न इतरांसाठी आज केंद्रावरील प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पित्याची दुधासाठी तगमग...