आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'त्या' आरोपीला सात वर्षांची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नऊ वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेट पैशांचे आमिष देऊन गावातीलच एका युवकाने शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात चार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. या प्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नीलेश अनिल वानखडे (३०) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विधी सूत्राच्या माहितीनुसार, दत्तापूर ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ११ ऑक्टोबर २०११ ला एक नऊ वर्षीय चिमुकली नीलेशने तिला रस्त्यात गाठले. या वेळी तिला पैसे चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. काही वेळानंतर ती चिमुकली घरी परतली. तिने या प्रकाराबाबत आईला सांगितले. यामुळे तिच्या आईने त्याच दिवशी दत्तापूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नीलेशविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपीला त्याच दिवशी अटक करून तपास पूर्ण केला. या प्रकरणाचे २३ डिसेंबर २०११ ला दोषारोपपत्र दाखल केले होते.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सात साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या असून, आरोपीला सात वर्षे कारावास सात हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षाकडून अॅड. राजीव इंगोले यांनी युक्तिवाद केला.
बातम्या आणखी आहेत...