आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शस्त्रांच्या धाकावर धुमाकूळ घालणारे त्रिकूट झाले जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर- शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तंभ चौकातील वाइनबार, गेम पार्लर आणि एक हॉटेल अशा तीन ठिकाणी धुमाकूळ घालून शस्त्राच्या धाकावर तोडफोड करत हॉटेलमालकाला पाच हजार रुपयांनी लुटणाऱ्या त्रिकुटाला दर्यापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुरुवारी (दि. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

रामेश्वर इंगळे (४४), शेख नईम शेख कलीम (२८) आणि बाळू इंगळे (३५, तिघेही रा. दर्यापूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस सूत्रानुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रामेश्वर इंगळे, शेख नईम, बाळू इंगळे यांनी हातात धारदार शस्त्र जयस्तंभ चौकात धुमाकूळ घातला. दरम्यान, वाइन बार, गेम पार्लर येथे तोडफोड केली, तर एका हॉटेल मालकाला नोकरांना शस्त्राचा धाक दाखवत गल्ल्यातील पाच हजार रुपये काढून घेतले. तसेच बाजूच्या गेम पार्लर येथे पैसे हिसकावण्याच्या उद्देशाने काचेची मशीन फोडून तीन हजार रुपयांचे नुकसान केले. या वेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर येऊन तिघांनाही ताब्यात घेतले. सुरेश तराळ यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी तिनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी आठवडीबाजार असल्याने गर्दी होती. त्यामुळे या घटनेने अधिकच खळबळ उडाली होती. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार जे. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण तळी, सिद्धार्थ आठवले हे पुढील तपास करीत आहेत.