आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम : वाहन चाेरट्यांना १२ पर्यंत पाेलिस काेठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डॉ.पंजाबराव हाउसिंग सोसायटीमधून अडीच महिन्यांपूर्वी चोरण्यात आलेले बोलेरो वाहन गुजरातमध्ये सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. सोमवारी पहाटे पोलिस पथकाने या चारही आरोपींना शहरात आणले आहे. न्यायालयाने त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुजरातमधील वठवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ दिवसांपूर्वी पोलिसांनी संशयाच्या आधारे एक बोलेरो वाहन पकडले होते. संशयितांनी या प्रकरणी उडवाउडवीची उत्तरे दिली. वठवा पोलिसांनी अटक केल्यावर त्यांच्याकडे चार रिव्हाॅल्व्हर आणि काडतूस आढळले होते. तपासादरम्यान त्यांच्याकडून मिळालेली बोलेरो अमरावती येथून चोरल्याचे समोर आले. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी वठवा येथे जाऊन त्या चारही आरोपींना सोमवारी पहाटे शहरात आणले. हे चारही आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असून, त्यांनी हे वाहन अमरावतीतून विकत घेतले आहे. पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली असता ते वाहन चोरले नसून अडीच लाख रुपयांत ते विकत घेतले घेतल्याचे संशयितांचे म्हणणे अाहे. या वाहनाची मूळ कागदपत्रे बदलवून बनावट कागदपत्रे तयार केली त्याच कागदपत्रांच्या आधारे वाहनावर बनावट क्रमांक टाकला होता.
गुजरात पोलिसांनी वाहन पकडले त्या वेळी वाहनावर बनावट क्रमांकच नमूद होता. पोलिसांनी चारही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या वाहनाची चोरी करून विक्री करणारे आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांचा अाता पाेिलस शाेध घेत अाहेत. वाहनाची बनावट कागदपत्रे कुठे तयार करण्यात अाली याचाही पोलिस तपास करत असून, लवकरच याचा उलगडा हाेईल, असा विश्वास पाेिलसांनी व्यक्त केला अाहे.