आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांवरील बस थांब्यांवर चाेरट्यांनी मारला डल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरबस सुरु करताना ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या थांब्यांचे शेडस् गायब करण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. काही ठिकाणी खुर्च्या आहेत तर शेडस् गायब झाले आहे आणि काही ठिकाणी या दोन्ही बाबी असल्या तरी दोन्ही कडेला लावण्यात आलेले बोर्डस् गायब आहेत.

अमरावती-बडनेरा मार्गावर सर्वाधिक बसेस धावतात. त्यामुळे या मार्गावर थांबेही जास्त आहेत. मात्र चोर आणि इतरांसाठी हीच पर्वणी ठरली असून त्यांनी त्यावर डल्ला मारला आहे. परिणामी अनेक ठिकाणचे स्ट्रक्चर नष्ट झाले असून याबाबतची कोणतीही नोंद शासन किंवा प्रशासनाकडे नाही. प्रशासनाच्या लेखी हे बसथांबे आजही जसेच्या तसेच असून त्याला जराही नुकसान पोहोचले नाही.

अमरावती महापािलकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या ‘आमची परिवहन’ सेवेसाठी शहरात २२ िठकाणी नवे थांबे उभारण्यात आले होते. िकमान दहा जणांना बसता येईल, अशी आलीशान व्यवस्था आणि त्याच्या दीडपट प्रवाशांना उभे राहता येईल, अशी सोय असलेले हे थांबे होते. या थांब्यांच्या दोन्ही बाजूंना स्टील धातूचा वापर केलेले बोर्डस् लावण्यात आले होते. या बोर्डांमध्ये अमरावती शहरातील सर्व वस्त्यांचा उल्लेख करण्यात आला असून त्या-त्या भागात जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक दुसऱ्या बाजूला िडस्प्ले करण्यात आले होते. मात्र सध्यस्थितीत एकाही थांब्यावर असे बोर्डस् दिसून येत नाही. प्रारंभी या बोर्डसमधिल प्रकाश व्यवस्था मोडीत काढली गेली. नंतरच्या काळात ते वाकवून त्यातील लोखंड गायब करण्यात आले, असे काही जणांचे म्हणणे आहे.

कोणी केला असेल हा प्रकार ?
लोहा-लोखंडिवकून चार पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी काहींनी हा प्रकार केला, तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला थाटलेली दुकाने चालविताना त्रास होतो म्हणून बसथांब्यांचे शेड तोडले गेले. अशाप्रकारे शहरातील भुरटे चोर रस्त्याच्या कडेला दुकाने थाटणाऱ्या व्यवसायिकांनी हा गोंधळ केल्याचे संदर्भ प्राप्त झाले आहेत. गोपालनगर, नवाथे प्लॉट, राजकमल चौक, कॅम्पचे (होटल महफीलसमोर) थांबे पाहिल्यास हा प्रकार सहज लक्षात येतो.

कधीकाळी पूर्णत: उभारलेल्या शहर बस थांब्यांची आजची अवस्था.
गोपालनगर येथील बस थांबा गायब त्यामुळे प्रवाशांना ऊन, वारा, पावसात बसची प्रतीक्षा करत उभे राहावे लागते.

लाकडी बेंचचीही मोडतोड
चोरांनीकेवळ बसथांब्यांवरच डल्ला मारला नाही तर त्याशेजारी लावण्यात आलेले लाकडी बेंचही गायब केलेले आहेत. लोखंडी फ्रेमवर लाकडी फळ्या जोडून िहरव्या रंगांचे काही बेंच शहरात उभारण्यात आले होते. परंतु प्रारंभी त्याच्या लाकडी फळ्या गायब झाल्या तर नंतर लोखंडी फ्रेम चोरीस गेली. राजकमल चौकातील वनीता समाजच्या उजव्या बाजूला असलेला बेंचही असाच गायब झाला आहे.

दोषींवर व्हावी कारवाई
बसथांब्यांचेशेड्स गायब असल्याचे माझ्या लक्षात आल्यामुळे मी त्याबाबतची तक्रार मनपा आयुक्तांकडे दिली आहे. काही ठिकाणी हा प्रकार जाणीवपूर्वक केला गेला असल्याने दोषींवर कारवाई व्हावी, ही माझी मागणी आहे. त्यासंदर्भात आयुक्त काय निर्णय घेतात, हे ते अमरावतीत परतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. प्रविणहरमकर, विरोधी पक्ष नेते, मनपा.
बातम्या आणखी आहेत...