आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांत मिरची पुड फेकून दुचाकीस्वाराचे अडीच लाख लुटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एकादुचाकी स्वाराच्या डोळ्यांत मिरची पुड फेकून तसेच मारहाण करून त्याच्याकडे असलेली दोन लाख ८० हजार रुपयांची रोकड दोन चोरट्यांनी लंपास केली. ही घटना तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिरजगाव मोझरी ते धोत्रा मार्गावर शुक्रवारी सकाळी घडली आहे. प्रशांत मारोतराव दुधकवरे (३२, रा. तिवसा ) असे दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे.
प्रशांत दुधकवरे हे एका फायनान्स कंपनीचे कर्मचारी आहेत. ही कंपनी बचत गटांना कर्ज वाटप करते. शुक्रवारी प्रशांत बचत गटांना कर्जवाटप करण्यासाठीच दुचाकीने जात होते. या वेळी त्यांच्याकडे दोन लाख ८० हजार रुपये होते.

ही रक्कम एका पिशवीत घेऊन ते दुचाकीने शिरजगाव मोझरीवरून धोत्रामार्गाने जात होते. याचवेळी मागून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पुड फेकली, यामुळे ते दुचाकीवरून कोसळले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्याकडील रोख असलेली पिशवी घेऊन लंपास केली. या प्रकरणाची तक्रार प्रशांत यांनी तिवसा पोलिस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध वाटमारीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याची माहिती तिवसाचे ठाणेदार अनिल लाड यांनी दिली आहे.