आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका रात्रीत तीन धाडसी घरफोड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरात मंगळवारी रात्री तीन धाडसी घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी महावीरनगर परिसरातील तीन घरे फोडून 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तिन्ही घरं एकाच ठिकाणी असून, दोन घरांमध्ये कुटुंबांतील सदस्य झोपले असताना चोरट्यांनी हातसफाई केली. तिन्ही चोर्‍या राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्या.
पहिल्या घटनेत मनोज मधुकर खोडे यांच्या घरातील सदस्य जेवण करून झोपले असता चोरटे मागील खिडकीतून घरात शिरले आणि साडेतीन ग्रॅम सोन्याचे दागिने, चार हजारांची रोकड, असा सोळा हजार रुपयांचा ऐवज लांबवला. या दुमजली घराच्या पहिल्या माळ्यावरील घरही चोरट्यांनी फोडले. वरच्या माळ्यावरील संगीता गजानन गटके यांच्या घरातून 25 हजार रोख, 10 ग्रॅमचे दागिने, असा 66 हजारांवर हात साफ केला. चोरट्यांनी यानंतर शेजारच्या घरी मोर्चा वळवला. राजेश मधुकरराव रोंघे कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी येथून दोन ग्रॅमचे सोने, 1500 रुपये रोख असा ऐवज चोरून नेला.

मंगळवारी सकाळी तिन्ही घटना उघडकीस आल्यानंतर राजापेठ पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, गोपाल उपाध्याय या अधिकार्‍यांनी चोरी झालेल्या घरांची तपासणी केली. डॉग स्कॉडद्वारे पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चोरी करण्याच्या पद्धतीवरून पोलिस तपास करत असल्याचे प्रमेश आत्राम यांनी सांगितले.