आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धेतून चोरी झालेली कार सापडली वडाळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चारदविसांपूर्वी वर्धा येथून चोरी गेलेली कार शनिवारी वडाळी परिसरात बेवारस स्थितीत आढळली. फ्रेजरपुरा पोलिसांनी कार ताब्यात घेऊन वर्धा पोलिसांसोबत संपर्क साधला आहे.

अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेवर पुलाखाली पांढऱ्या रंगाची कार (एमएच २९ आर ६३४७) बेवारस असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही कार परिसरातील नागरिकांची असल्याचे त्यांना कळले. पोलिसांनी कार ताब्यात घेतली. दरम्यान, चौकशीनंतर संबंधित कार वर्धा येथून ११ नोव्हेंबरला चोरीला गेलेली असून, अण्णा झाडे यांनी याप्रकरणी वर्धा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. वर्धा पोलिसांकडून फ्रेजरपुरा पोलिसांना ही माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे कार ठाण्यात आणून पुढील प्रक्रिया सुरू केली असल्याचे फ्रेजरपुराचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी सांगितले.