आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी साहित्यात या वर्षी आता "नो लिंकिंग'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दरवर्षी कृषी साहित्य प्रामुख्याने खतांच्या विक्रीसोबत गरज नसताना ‘लिंकिंग’चे खत शेतकऱ्यांच्या माथी मारून सरेआम लूट करण्याच्या गोरखधंद्याला शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
दरवर्षी बियाण्याचे एखादे वाण किंवा खतांचा तुटवटा निर्माण झाल्यास त्याची विक्री करताना शेतकऱ्यांच्या माथी लिंकिंग’चे खत मारण्यात येत होते. लिंकिंग’च्या या खताचे कोणतेही बिल दिले जात नसे. जिल्ह्यात प्रामुख्याने युरियाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर काही कृषी केंद्र चालक राखीव साठा करून लिंकिंगचे खत शेतकऱ्यांच्या माथी मारत असे. यातून बक्कळ कमाई करून शेतकऱ्यांचे सर्रास खिसे कापले जात असत. मागील हंगामात युरियासोबत विविध कंपन्यांनी पोटॅश इतर सूक्ष्म खतांचे लिंकिंग केल्यामुळे शेतकऱ्यांना गरज नसताना लिंकिंगचे खत खरेदी करून नाहकचा भुर्दंड सहन करावा लागत होता. लिंकिंगचे खत घेतल्यास २८४ रुपयांची युरियाची बॅग ३५० रुपये त्यापेक्षा अधिक दराने शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत असे.
अनेक ठिकाणी लिंकिंगचे खत खरेदी केल्यास शेतकऱ्यांना युरिया नाकारला जायचा. परंतु यावर्षी शासनाने अशा प्रकारच्या विक्रीवर कडक निर्बंध आणले आहेत. शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रावरून खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी अवजारे खरेदी करताना त्याच्या सोबत मागणी नसणारे इतर कोणतेही कृषी उत्पादन घेण्याची सक्ती नाही. कृषी सेवा केंद्र धारक बळजबरीने इतर उत्पादने विक्री करीत असल्यास तसेच जादा दर आकारत असल्यास शेतकऱ्यांनी या बाबतची तक्रार संबंधित तालुका कृषी अधिकारी , कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे नोंदवण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत बिल घ्यावे. बिलावर खरेदी केलेल्या साहित्याचा संपूर्ण तपशील (लॉट नं., बॅच नं.) योग्यरीत्या असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.
एखादा कृषी केंद्र चालक अशा स्वरूपाची विक्री करताना आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय आहे 'लिंकिंग'...
बातम्या आणखी आहेत...