आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन अपघातांत दोन ठार, पाच जखमी; आष्टी, नांदगावपेठसह नवसारी फाट्यावरील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती येथून परतवाड्याकडे जाणार्‍या दुचाकीस्वाराला कारने दिलेल्या धडकेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. दुसरीकडे नांदगाव पेठ बसस्टॉपवर दिलेल्या धडकेत एका वृद्धाला प्राण गमवावा लागला. तिसर्‍या घटनेत नवसारीनजीक कार व ऑटोमध्ये झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. हे तिन्ही अपघात मंगळवारी झाले आहेत.
राजू जगुजी येवले (30 रा. वडगाव ता. परतवाडा) असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते दुचाकीने (एमएच 27 एजे 8141) परतवाड्याकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणार्‍या कारसोबत (एम. एच. 31 एएच 1151) अपघात झाला. पोलिसांनी या प्रकरणी कारचालक प्रफुल्लचंद निर्मलकुमार जैन (रा. ईतवारी, नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वलगावचे ठाणेदार राधेश्याम शर्मा यांनी दिली.
दुसरा अपघात नांदगाव पेठ येथे झाला. बापुराव उर्म‍या वाडके (80, रा. नांदगाव पेठ) बसथांब्यावर रस्ता ओलांडत असताना त्यांना एका वाहनाने धडक दिली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
तिसर्‍या अपघातात ऑटो व कारचा यांच्यात धडक झाली. यामध्ये ऑटोचालक तुळशिराम नंदराम कराळे (40, रा. खारतळेगाव) यांच्यासह प्रवासी किशोर भाऊराव जंवजाळ (42), वासुदेव इंगोले (72 दघेही रा. वायगाव) संदीप भगवंतराव सावळीकर (25 रा. वलगाव) आणि फातीमा बी शेखजी (70 रा. गणोरा) हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती प्राप्त होताच गाडगेनगर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले आहे.