आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अपघातांत तीन ठार, जुना बायपास एक्स्प्रेस हायवेजवळ झाले अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात झालेल्या भीषण अपघातात दोघे युवक ठार झाले. शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. धडक दिल्यानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची इर्विन रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. दुचाकीवरून दोन्ही युवक जुन्या बायपासने बडनेरा येथून अमरावतीला येत होते. जुन्या बायपास मार्गावर असलेल्या पोलिस चौकीसमोर दुचाकी ट्रकवर आदळली.
अपघाताची माहिती मिळताच राजापेठ पोलिस तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही युवकांना तातडीने इर्विनमध्ये दाखल करण्यात आले होते. शनविारी रात्रीपर्यंत मृतक युवकांची ओळख पटली नव्हती. दुसऱ्या घटनेमध्ये शुक्रवारी उशिरा रात्री एक्स्प्रेस हायवेवर दोन दुचाकीमध्ये धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला.