आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याचे तिघेजण नेपाळमध्ये सुरक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भूकंपानंतर नेपाळमध्ये अकोला येथील तिघे जण सुरक्षित असल्याची माहिती अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात प्राप्त झाली आहे.अकोला पंजाब दालमिलजवळील गुलजारपुरा येथील संजय अग्रवाल यांच्या कुटुंबातील सदस्य नेपाळला गेले आहेत.हे कुटुंबदेखील नेपाळला अडकल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, करिश्मा संजय अग्रवाल, सिमरन संजय अग्रवाल आणि पार्थ संजय अग्रवाल हे नेपाळमध्ये सुखरूप असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयात प्राप्त झाली. अग्रवाल कुटुंबीय काठमांडू येथील कालीमाटी झिलेट शाळेजवळच्या मैदानात मुक्कामास असल्याची माहिती ललित अग्रवाल यांच्याकडून प्राप्त झाली.