आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चप्पलची ‘टायरी’ फॅशन न्यारी, दर महिन्याला होते जवळपास तीनशे जोडची विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंगावर फॅन्सी टी शर्ट, जीन्स पँट, ब्रँडेड हँडवॉच अन् महागडी कॉलेज बॅग वापरणाऱ्या शहरातील तरुणाईमध्ये सध्या टायरी चप्पलची फॅशन दिसत आहे.

बदलत्या फॅशन जगतातील तऱ्हेतऱ्हेचे नामांकित कंपन्यांचे बुट, चपला वापरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना आता टायर सोलपासून तयार केलेल्या चपला, सँडल आकर्षून घेत आहेत. युवकांना या चपलेची पसंती असून, दिवसाला किमान दहा ते बारा जोडची विक्री होते, असे एका विक्रेत्याने सांगितले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची चप्पल म्हणून टायरी चप्पलकडे पाहिले जाते. शेतकामासाठी मजबूत, टिकाऊ आणि स्वस्त दरात मिळणाऱ्या या चपलीला शेतकऱ्यांची आजही प्रचंड मागणी आहे. काळ बदलला.. फॅशन बदलली.. आणि ही ‘रफ अँड टफ’ राहणारी चप्पल युवकांच्या पसंतीत उतरली. शहरातील युवक, व्यावसायिकांकडून या चप्पलची प्रचंड मागणी आहे.
* 40 ते 100 रुपयांमध्ये मिळते टायर सोलपासून तयार केलेली चप्पल.
* 02 पेक्षा अधिक वर्षे टिकू शकते चप्पल.
* 50 च्या जवळपास विक्रेते आहेत शहरात.
सध्या शहरात अशा प्रकारच्या विविध डिझाइन तयार होतात.

अशी साकारते
मोठ्याचारचाकी वाहनाचे जुने टायर आणि ट्यूबपासून टायर सोल चप्पल तयार केल्या जातात. टायरच्या सोलमध्ये चपलेचा आकार कापून त्याला ट्यूबपासून तयार केलेले पट्टे बसवले जातात. नंतर काळ्या रंगाची पॉलिश देऊन चकचकीत चप्पल तयार केली जाते.

तीनशे जोडची विक्री
-युवकांकडूनया चपलेला मागणी आहे. महिन्याला सुमारे तीनशे चपलांची विक्री होते. शेतकऱ्यांकडून पूर्वीपासून मागणी आहे. युवकांकडून होणारी खरेदी आशादायक आहे. निखिलेशअहेरवार, विक्रेते,चित्रा चौक