आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tobacco Is Harmful To Health Issue At Amravati, Divya Marathi

तंबाखू घेतो पाचशे अमरावतीकरांचा बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे शहरात दरवर्षी अंदाजे पाचशे जणांचा बळी जातो. जिल्हाभरात हे प्रमाण पंधराशेच्या आसपास आहे. मेळघाटातून कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातल्यानंतरही सर्रास छुपी विक्री सुरू आहे. मागील पाच वर्षांत 13 ते 19 वर्षे वयोगटात तंबाखूचे व्यसन वाढले असून, हा गट रुग्ण म्हणून सर्वाधिक प्रमाणात दाखल होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घातक व जीवघेणे दुष्पपरिणाम बघता, जनजागृतीसाठी शासन देशात दरवर्षी एक हजार कोटी रुपये खर्ची घालते. याउलट तंबाखू व गुटखाजन्य पदार्थांची विक्री दोन हजार कोटींची असल्याचे सूत्रांनी सांगितले.

उपचार : पीडित रुग्णांवर शंकरनगर येथील कॅन्सर फाउंडेशनमध्ये कमी खर्चात उपचार उपलब्ध आहेत. अत्याधुनिक मशीनद्वारे रेडिओथेरेपी, कॅन्सर सर्जरी, किमोथेरपी तसेच पॅलिएटिव्ह केअर सेंटरसारख्या सुविधा आहेत.