आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता अन् जनप्रबोधन करणारे ‘गाडगेबाबा’ शहरात दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मायबापहो ! व्यसन, व्यभिचार करू नका, मांसाहार घेऊ नका, भ्रष्टाचारापासून दूर रहा; अंधश्रद्धा, जातीभेद मानू नका असे सांगत गावोगावी साफसफाई करून लोकांच्या मनातील घाण साफ करणारे ‘गाडगेबाबा’ शुक्रवारी गाडगेनगरमध्ये भेटले. अर्थात संत गाडगेबाबा यांच्या सारखे दिसणारे, त्यांच्या विचारांचे प्रसारक ठाणे जिल्ह्यातील ८१ वर्षीय जगन्नाथ महाराज सध्या शहरात दाखल झाले आहेत. १९५२ ते ५६ पर्यंत ते संत गाडगेबाबा यांच्या सहवासात होते.

कल्याण तालुक्यातील काटईगाव येथील रहिवासी जगन्नाथ महाराज यांची वयाच्या १८ व्या वर्षी संत गाडगेबाबांसोबत भेट झाली. तेव्हापासून संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजप्रबोधनाला सुरुवात केली. आपल्या पंधरा सहकाऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात गावोगावी जाऊन त्यांनी स्वच्छता जनप्रबोधन केले आहे. सध्या संत गाडगेबाबा पुण्यतिथीनििमत्त ते शहरात आहेत. संत गाडगेबाबा स्मृतिवाहनाने गावोगावी ते फिरता मुक्काम करतात. गाडगेबाबांचा वेष धारण करून गावोगावी फिरणाऱ्या जगन्नाथ महाराज यांना व्यसनमुक्तीचा देवदूत म्हणून ओळखतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन १९८८ या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या दारूबंदी संचालनालयाने त्यांचा गौरव केला.

कोणाच्याही पैशांना हात लावता प्रबोधनाचे काम ते निरपेक्षपणे करतात. ग्रामसफाई, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्त्व, अस्पृश्यता निवारण, बचतीचे महत्त्व, वृक्षारोपण अशा विविध विषयांवर लोकांमध्ये जनजागृती करतात. व्यसन, मांसाहार, जुगार, व्यभिचार, भ्रष्टाचार याचे दुष्परिणाम ते लोकांना पटवून सांगतात. आपल्या पंधरा ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत ते हे प्रबोधन कार्य करतात.

डोंबिवलीमध्ये भेटले होते संत गाडगेबाबा
-१९५२ला डोंबिवलीमध्ये गाडगेबाबांचे कीर्तन होते. एका श्रीमंत व्यक्तीने त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले; पण ते गेले नाहीत. झोपडपट्टीमध्ये जाऊन त्यांनी साफसफाई केली. तेथेच जेवण घेतले कीर्तन केले. मी अठरा वर्षांचा होतो, तेव्हा गाडगेबाबांची भेट झाली. जगन्नाथमहाराज, विचारप्रसारक

व्यसनांवर मुळीच खर्च करू नका
तुम्हीजर व्यसनावर दिवसाला पंधरा रुपये खर्च करत असाल, तर महिन्याला ४५० रुपये खर्च होतील. वर्षाला पाच हजार ४०० रुपये खर्च होतील. हाच सात वर्षांचा खर्च पकडला, तर व्यसनावर ३७ हजार ८०० रुपये खर्च होईल. या पैशांची बचत केल्यास आपल्यालाच त्याचा फायदा होऊ शकतो, असे सूत्र जगन्नाथ महाराज आपल्या भेटीमध्ये लोकांना सांगतात.
आई-वडिलांसारखे दुसरे दैवत नाही
आई-वडिलांसारखेदैवत नाही, जन्मभूमीसारखे तीर्थ नाही; व्यसन सोडणे, स्वच्छता करणे, आई-वडिलांची सेवा करणे अशा विविध कार्याची शपथ घेणाऱ्या नागरिकांचा जगन्नाथ महाराज स्वत: सत्कार करतात. पाप होईल असे काही करू नका; रोग होईल असे खाऊ नका; कर्ज होईल, एवढा खर्च करू नका; आई वडिलांसारखे दैवत नाही; जन्मभूमीसारखे तीर्थ नाही, अशी सुखी जीवनाची सूत्रे जगन्नाथ महाराज गावाेगावीच्या आपल्या मुक्कामात साऱ्यांना सांगतात.