आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजेसचे शुल्क वाढवण्याच्या प्रस्तावावर आज शिक्कामोर्तब?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये वाढ केली जाणार अाहे,अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे. विविध शुल्कांचा नव्याने समावेश केलेला हा शुल्क सुसंगतीकरणाचा प्रस्ताव विद्वत परिषदेसमोर ठेवला जाणार आहे. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या मंगळवारी २८ एप्रिलला होऊ घातलेल्या बैठकीत शुल्कवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात प्रत्येक दोन वर्षांनी दहा टक्के नैसर्गिक वाढ केली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक सहा वर्षांनी शुल्काचे सुसंगतीकरण करण्याबाबत विद्यापीठ कायद्यात नमूद आहे. दहा टक्के उर्वरित.पान १२
नैसर्गिकवाढीसह गॅदरिंग, डेव्हलपमेंट मेंटनन्स शुल्कालादेखील कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न विद्वत परिषदेत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने नवीन रचना अन्यायकारक ठरणार, अशीच आहे. जून २००८ नुसार विद्यार्थ्यांच्या शुल्कबाबत अनुदानित स्वयंसहाय्यित तत्त्वावरील अभ्यासक्रमांचे शुल्क शुल्कवाढीचे सुसंगतीकरण केले होते. मागील रचनेस सहा वर्षे पूर्ण झाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी शुल्काचे नव्याने सुसंगतीकरण करणे तसेच शुल्कवाढीचा प्रस्ताव २९ मार्च २०१४ रोजी झालेल्या सिनेटमध्ये ठेवला होता. त्यानंतर २६ २७ सष्टेंबर १४ रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या सभेत या विषयावर चर्चा केली. त्या वेळी शुल्कवाढ रचना तयार करण्याबाबत समितीचे गठन केले होते. समिती तसेच वित्त लेखा समितीकडून केलेल्या शिफारशी विद्वत परिषदेसमोर ठेवल्या जाणार आहेत. पश्चिम विदर्भात सातत्याने दुष्काळी परिस्थती असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यादेखील होत आहेत. शेतीच्या नापिकीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रभावित झाली असून, शहरी भागावरदेखील त्याचा परिणाम स्पष्ट जाणवत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परिक्षेत्र अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत असून, याच क्षेत्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये शहरात असली, तरी त्यामध्ये प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटंुबातीलच आहेत. दुष्काळी परिस्थितीने आधीच अनेकांसमोर संकट उभे केले आहे. विद्यापीठाकडून शुल्कात वाढ करीत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे.
व्यवस्थापन परिषदेने फेटाळला प्रस्ताव
शुल्क सुसंगतीकरणाबाबत समिती वित्त लेखा समितीच्या शिफारशी १२ फेब्रुवारी १५ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर ठेवल्या होत्या. विद्वत परिषदेत चर्चा होता विषय चुकीच्या मार्गाने आणल्याने व्यवस्थापन परिषदेकडून शुल्क सुसंगतीकरणाचा विषय फेटाळला होता. गॅदरिंग, डेव्हलपमेंट मेंटनन्स शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारता येते का, ही बाब तपासण्याची सूचनादेखील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पी. बी. रघुवंशी यांनी केली होती.
संस्थाचालकाकडून प्रस्ताव
शुल्कवाढ सुसंगतीकरणाचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासन नाही, तर संस्थाचालक तथा सिनेट सदस्य वसंत घुईखेडकर यांनी सर्वप्रथम मांडला. २९ मार्च १४ रोजी झालेल्या सिनेट सभेत या विषयावर चर्चा केली होती. या प्रस्तावाच्या अनुषंगाने यापूर्वी व्यवस्थापन परिषदेच्या २९ डिसेंबर २००६ च्या बैठकीतील निर्णयाचा आधारदेखील घेण्यात आला. वित्त लेखा समितीच्या शिफारशी ३० मे २००८ रोजी व्यवस्थापन परिषदेकडून मान्य केल्या होत्या.

हे शुल्क वाढेल
शिक्षणशुल्काव्यतिरिक्त वाढ करण्याचा प्रस्ताव विद्वत परिषदेसमोर आहे. महाविद्यालयाकडून यापूर्वी बेकायदेशीरपणे गॅदरिंग, डेव्हलपमेंट आणि मेंटनन्स शुल्क वसूल केला जात आहे. नवीन रचनेत या शुल्कांचा समावेश होण्याची शक्यता आहे.