आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज वाजणार शाळेची घंटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आजपासूनपुन्हा स्कुलव्हॅनच्या खिडकीतून पावसाचे थेंब झेलता येणार.. स्वच्छ अक्षरातील होमवर्कवर मीस गुडचा शेरा देणार..नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध..नवी नवी कपडे..मित्रांसाेबतचे मधल्या सुटीतील खेळ..पुढचा वर्ग..पुढचा अभ्यास..प्रार्थनेसाठी लागलेल्या रांगा..खाऊ देणाऱ्या मिस या साऱ्या बाबी नव्याने अनुभवता येणार अशी उत्सुकता शालेय विद्यार्थ्यांमध्ये आहे. शुक्रवार, २६ जूनपासून जिल्ह्यातील शाळांची घंटी वाजणार आहे.
शुक्रवारी शाळेची पहिली घंटा वाजणार असल्याने उन्हाळ्याच्या सुटीत गावोगावी गेलेले शालेय विद्यार्थी पुन्हा एकमेकांना भेटणार आहेत. शालेय गणवेश, छत्री, रेनकोट, टीफीन बॉक्स, वॉटर बॅग इतर साहित्य खरेदीसाठी गुरूवारी (दि. २५) बाजारात पालकांची वर्दळ पहायला मिळाली. पालकांसोबत विद्यार्थी बाजारात दिसत होते. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शालेय यंत्रणा सज्ज झाली आहे. काही शाळांच्या परिसराची साफसफाई करण्यात आली आहे.
शहरातील बाजारपेठ मोठी असल्याने तालुक्याच्या ठिकाणाहूनही काही पालक खरेदीसाठी बाजारात आले होते. सहावी, सातवीतील विद्यार्थ्यांसाठी पालकांनी नव्या सायकलीही खरेदी केल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...