आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचा टोल ‘जैसे थे’; अवजड वाहनांसाठी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नांदगावपेठ येथील टोलनाक्यावर बुधवारपासून (दि. एप्रिल) सुधारित दर लागू होणार आहेत. यात कार आणि हलक्या वाहनांचा टोल दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे; परंतु व्यावसायिक वाहनांच्या टोल दरात वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलचे सुधारित दर मंगळवारी जाहीर केले. मंगळवारी ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपासून नवे टोल दर लागू होतील, असे आयआरबी टोल नाक्याचे महाव्यवस्थानक भरत खासबागे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. टोलच्या दरात वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव आयआरबी आणि एनएचएआयकडून दिल्ली येथील मुख्यालयाला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरात प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार, नव्याने दर लागू करण्यात येणार आहेत. दुचाकी वाहनांना आतापर्यंत कोणताही टोल कर लागत नव्हता. यानंतरही तो लागणार नाही, असे एनएचएआयच्या अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.
कार,जीपला वाढ नाही : एनएचएआयनेदरवाढ करताना घरगुती कारणांसाठी वापरण्यात येणा-या कार, जीप आणि हलक्या वाहनांना सूट दिली आहे. त्यांना पूर्वी होता तेवढाच टोलचा दर द्यावा लागणार आहे. उर्वरित वाहनांना मात्र आता जादा दर मोजावा लागेल.
मोर्शीचा तिढा कायम
मोर्शीयेथून येणा-या वाहनचालकांना टोलचा विनाकारण भुर्दंड सहन करावा लागतो. यासंदर्भात काही संघटनांनी आवाज उठवला होता. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या मुद्द्यावर बैठकही बोलावली होती. परंतु हा तिढा अद्यापही कायम आहे.