आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरव्या शालूत खुलले मेळघाटचे सौंदर्य, चिखलदऱ्यात वाढला पर्यटकांचा ओघ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हिरव्यागर्द डोंगरांच्या कुशीतून खळखळणारे धबधबे.. मनमोहक क‍िलबिलाटानं मन प्रसन्न करणारी चिमुकली पाखरं.. अंगाला शिवून जाणारे तुषारकणं अन् हिरवी शाल पांघरून पशूपक्षांना पोसणारी धरणीमाय, सध्या नटली आहे. तसा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ चिखलदरा येथे वाढला आहे. सातपुड्यातील या सौंदर्याचं गीत गात वाहणारा गार वारा पर्यटकांना भूरळ खालत आहे.

आठवड्याच्या शेवटी सुटीचे नियोजन करून विविध जिल्ह्यांतील पर्यटक मेळघाट सहलीचा बेत आखत आहेत. चिखलदरा परिसरातील सर्व धबधबे, ओढे, नद्या खडखडत आहेत. पानवठेही भरले आहेत.

ढगांमध्ये लपलेले पर्वत आणि पर्वतांच्या कुशीत वसलेली छोटी गावं नवीन पर्यटकांच्या पसंतीस पडत आहेत. अमरावती शहर, परिसरातील युवक दुचाकीने चिखलदरा सहलीचा आनंद घेत आहेत. विविध पक्षी, फुलपाखरांसाठी पोषक वातावरण असलेल्या मेळघाटात अभ्यासक, पर्यावरणप्रेमींचा वावरही वाढला आहे. मेळघाटातील निसर्ग विदर्भाची शान आहे. त्यामुळे येथील पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची पर्यटकांनी विशेष काळजी घ्यायला पािहजे अशी प्रतिक्रीया यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यातील काही पर्यटकांनी दिली.
ओढ्यावर बांधण्यात आलेल्या बांधावरून वाहणाऱ्या प्रवाहाचा आनंद घेताना पर्यटक.