आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची समोरासमोर धडक; दोन गंभीर , तामसवाडी फाट्याजवळ रात्री घडला अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगावसुर्जी - दोनट्रकची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण गंभीर झाले असून, दोन्ही ट्रकचा चक्काचूर झाला आहे. हा भीषण अपघात दर्यापूर-अंजनगावसुर्जी मार्गावरील तामसवाडी फाट्यानजीक मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
जितेंद्रसिंह सुरेंद्रसिंह जाधवन (१९, रा. ग्वालियर) आणि राजू गुलाबराव सूर्यवंशी (२९, रा. जामठी) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एमपी ०९/ एचबी २६८१ क्रमांकाचा ट्रक ढेपेचे पोते घेऊन दर्यापूरहून बैतुलकडे रवाना होत होता. तर, एमपी ०७ एबी १८६२ क्रमांकाचा ट्रक अंजनगावसुर्जी येथून लातूरकडे रवाना होण्यासाठी निघाला हाेता. दरम्यान, रात्री ११.३० वाजताच्या सुमारास दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील तामसवाडी फाट्यानजीक येताच दोन्ही ट्रक समोरासमोर धडक होऊन ट्रक उलटले. यात जितेंद्रसिंह जाधवन राजू सूर्यवंशी गंभीररीत्या जखमी झाले, तर दोन ट्रकचा समोरचा भाग अक्षरक्ष: चक्काचूर झाला. या अपघातामुळे पुन्हा एक तुरीचे पोते घेऊन जाणारा ट्रक वाट काढण्याच्या प्रयत्नात असताना उलटला. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घटनास्थळावर धाव घेतली; तसेच रहिमापूर पोलिसांनीही घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत करत जखमींना अमरावती येथे उपचारासाठी हलवण्यात आले.