आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नांदगावपेठनजीकमोर्शी टी पॉइंटवर रविवारी सकाळी ट्रकने दुचाकीवर जाणाऱ्या दोघांसह दोन पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. चौघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशाल विनायक साकोरे (१८), विनायक नामदेवराव साकोरे (४५, दोघेही रा. नांदगावपेठ), शेखलाल वसोडी (४०) आणि चंदन सावजी भलावी (३५, दोघेही रा. मध्य प्रदेश ह. मु. नांदगावपेठ), अशी जखमींची नावे आहेत. विशाल आणि विनायक साकोरे हे शेतातील कामासाठी जात होते, याचवेळी चंदन शेखलाल हे त्याच मार्गावरून पायदळ जात होते. अपघाताची माहिती मिळताच शेकडो नागरिक घटनास्थळी पोहोचले.