आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक शिस्तीसाठी आता कारवाईऐवजी जनजागृती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस निरीक्षक नीलिमा आरज - Divya Marathi
पोलिस निरीक्षक नीलिमा आरज
अमरावती- शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी या पुढील काळात पोलिसांकडून कारवाईऐवजी जनजागृतीवर अधिक भर दिला जाणार आहे. लोकसहभागातून समस्या मुक्तीसाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे वाहतुकीला कायमस्वरूपी शिस्त लावण्यास निश्चितच मदत होणार आहे. सहकारातून समाधान शोधण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न राजापेठ परिक्षेत्राच्या वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक नीलिमा आरज यांनी सांगितले. दै. दिव्य मराठीने हाती घेतलेल्या अपघातमुक्त शहराच्या अभियानाकरिता ही बाब पूरक ठरणार आहे.
शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले रस्ते मात्र, मागील अनेक वर्षांपासून तेवढेच आहेत. अनेक ठिकाणी रस्ते आहे त्यापेक्षा मोठे करणे यापुढे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने नियमाचे पालन करून वाहन चालवल्यास वाहतुकीची गोची होणार नाही. शिवाय, अपघातसुद्धा थांबणार आहेत. वाहनचालकांना वाहतूक नियमांची जाण करून देण्यासाठी प्रत्येकाविरुद्ध कारवाई करणे, हा उपाय प्रभावी ठरणारा नाही. कारवाई करून ही समस्या थांबणारी नाही. अशावेळी व्यापक जनजागृती केल्यास वाहनचालकांना वाहतुकीचे नियम माहिती होणार, पर्यायाने त्या नियमांची अंमलबजावणी वाहनचालकाकडून करण्यात येणार आहे.
याचा अर्थ कारवाई होणारच नाही, असाही नाही. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर अमरावतीत रुजू झाले त्या दिवसांपासून प्रयत्नरत आहे. त्याच दृष्टीने त्यांनी वाहतूक विभागात व्यापक काही ऐतिहासिक बदलसुद्धा केले आहेत. शहरातील वाहतुकीच्या सुधारणेसाठी त्यांनी नुकतेच शहर वाहतूक शाखेच्या दोन भागांची तीन भागांत विभागणी केली आहे.

अधिक मनुष्यबळाची नितांत आवश्यकता
व्यापक मोहिमेसाठी घेणार विद्यार्थ्यांचीही मदत
राजापेठ वाहतूक विभागाची व्याप्ती अस्ताव्यस्त वाहतूक लक्षात घेता उर्वरित दोन्ही वाहतूक विभागांपेक्षा अधिक मनुष्यबळाची गरज राजापेठ विभागाला आहे. सध्या शहर वाहतूक विभागासाठी १५५ चे मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यांपैकी जवळपास ७० ते ७५ कर्मचाऱ्यांची मागणी राजापेठ वाहतूक विभागाकडून करण्यात येणार आहे.

व्यापक जनजागृतीसाठी आम्ही आमच्या वाहनांवर लाऊड स्पीकर लावणार आहे, त्याद्वारे वाहतूक नियमांची माहिती देण्यात येईल. तसेच प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देणार आहे. शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेण्याचाही आमचा प्रयत्न असून, विद्यार्थ्यांचा सहभाग कसा घेता येईल, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे

तीन-चार महिन्यांत दिसेल सकारात्मक बदल
कारवाईच्याधाकापेक्षा वाहनचालकांनी स्वताहून पुढाकार घेतल्यास ती शिस्त कायमस्वरूपी टिकेल.त्यासाठी आवश्यक उपाययोजना आम्ही करीत आहेत. राजापेठ शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या विभागाचा अभ्यास सुरू केला आहे. लवकरच आवश्यक बदल केले जातील.आगामी ते महिन्यांत वाहतुकीमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. नीलिमा आरज, पोलिस निरीक्षक, राजापेठ वाहतूक विभाग.