आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडून निघाले अन् तिकडे अडकले.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मालवीय चौकात नाल्याच्या बांधकामासाठी रेल्वे स्थानक ते मालवीय चौक हा मार्ग एका बाजूने आठ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीचा पुरता विचका झाला आहे. आता पुढील कामासाठी दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आल्याने ‘एका खोळंब्यातून निघाले अन् दुसरीकडे अडकले,’ अशी नागरिकांची स्थिती झाली आहे.
मालवीय चौकातील खड्डय़ाने रेल्वे स्थानक भागाकडील वाहतूक कित्येक महिन्यांपासून बंद आहे. इर्विन चौकातून मालवीय चौकाकडे येणारी वाहने त्यामुळेच विरुद्ध बाजूचा वापर करीत आहेत. त्यातच मालवीय चौकाकडून जाणारी व येणारी वाहने एकाच मार्गाचा वापर करीत असल्याने वाहनचालक या मार्गाने ट्रॅफिक जाम अनुभवत आहेत. दरम्यान, उड्डाणपुलाखालील भूमिगत नाला आणि मजीप्राच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. तेथील खड्डा स्लॅब टाकून बुजवण्यात आला आहे. एका बाजूचे काम झाल्यानंतर आता मालवीय चौकाकडून इर्विनकडे जाणारा रस्ता बांधकामासाठी बंद करण्यात आलाय. यामुळे आता रेल्वे उड्डाणपुलावर वाहतूककोंडी होईल.

एसटीचे ‘दाए मूड’ : मालवीय चौकातून बस स्थानकाकडे तसेच बस स्थानकातून जाणार्‍या बसफेर्‍यांचा मार्ग वळवण्यात आला आहे. तसे पत्र पोलिसांनी एसटीला दिले आहे. आता या बस टांगापाडाव, गांधी चौक, राजकमल चौक, रेल्वे स्थानक चौक मार्गे बस स्थानकात पोहोचतील.