आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅरिकेट्स लावल्‍याने नागरिकांना रस्ता दाखवण्यासाठी पोलिसांनी केली विनवणी...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी मालवीय चौकातून इर्विनकडे जाणार्‍या रस्त्याबाबत ‘वन वे’ची अधिसूचना जारी केली. पोलिसांनी जयस्तंभकडे जाणार्‍या वाहनांसाठी हा रस्ता बंद केला. येथे ट्राफिक पोलिसांनी केवळ एकाच बाजूने बॅरिकेट्स लावल्याने तारांबळ उडत आहे.
वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता, या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना रस्ता बंद आहे, हे सांगताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. ‘दादा’, ‘ताई’, ‘भाऊ’, ‘साहेब’ म्हणत रस्ता बंद असल्याच्या सूचना पोलिसांना या रस्त्याचा वापर करणार्‍यांना द्याव्या लागत आहेत.
बॅरिकेट्समुळे उडतेय तारांबळ
प्रशासनाने मालवीय चौकातील पुलाचे काम अगोदरच पूर्ण केले असते, तर नागरिकांना त्रास सहन करावा लागला नसता, अशा प्रतिक्रिया शहरातील नागरिकांनी व्यक्त केल्या.
नागरिकांनी सहकार्य करावे
इर्विन चौकातून जयस्तंभकडे मालवीय चौकातून मार्ग बंद केला आहे. नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी राजापेठकडे जाणारा मार्ग सुरू ठेवला होता. मात्र, नागरिकांच्या असहकार्याने नाइलाजास्तव हा रस्ता बंद करावा लागला.
नरेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा.