आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ .

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नववर्ष स्वागताच्या जल्लोषात ‘होश’ गमावणार्‍यांसाठी धोक्याची घंटा आहे. या काळात मद्य प्राशन करून वाहन चालवल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. मंगळवारपासून (दि. 24) शहरातील 46 ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम पोलिस आयुक्तालयाकडून सुरू केली जाणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्र आल्यावर मद्यप्राशन करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री उशिरा ‘कार्यक्रम’ आटोपल्यानंतर मद्य प्राशन करून घरी परतणारेही अनेक आहेत. यामुळे शहरात शांतता प्रस्थापित व्हावी तसेच कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, याचाच एक भाग म्हणून शहरात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम राबवली जाणार आहे.
वाहतूक पोलिसांची असेल कायम नजर
01 पोलिस निरीक्षक, 04 पोलिस उपनिरीक्षक, 151 वाहतूक कर्मचारी
बुधवारपासून सुरू होणार मोहीम
ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम बुधवारपासून (दि. 25) सुरू करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक पोलिस आणि संबंधित ठाण्यांच्या पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या कामी सहकार्य करावे.
अजित पाटील, पोलिस आयुक्त.