आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेशीला टांगले सारे नियम, ऑटोंच्या गर्दीने रस्ते जाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सर्वसामान्यांना बेशिस्त पार्किंगसाठी दंड ठोठावणारे पोलिस अनेक महिन्यांपासून ऑटोरिक्षाचालकांबाबत ‘सॉफ्ट कॉर्नर’ बाळगून आहेत. कायद्यानुसार चौकांच्या वळणांवर 24 मीटरपर्यंत पार्किंग देता येत नसतानाही पोलिसांनी ऑटोरिक्षांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
तत्कालीन पोलिस आयुक्त अजित पाटील व वाहतूक शाखा निरीक्षक राजमाने यांनी पार्किंगसाठी तत्परतेने सर्वेक्षण केले होते. जागा साबांविची असतानाही मनपास अनेक ठिकाणी ऑटोरिक्षा पार्किंग द्यायला लावले. बस स्थानक चौकातील निम्मी जागा ऑटोरिक्षा पार्किंगने गिळंकृत केली आहे. व्हीएसएमजवळील परिसरही प्लास्टिकचे बॅरिकेट्स उभारून ऑटोरिक्षाचालकांना देण्यात आला. चौकांच्या वळणांवर ऑटोरिक्षा सर्रास पार्क केल्या जातात.

केवळ ऑटोरिक्षांसाठी सर्वेक्षण : दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी नव्हे, ऑटोरिक्षा पार्किंगपुरते सर्वेक्षण केले गेले, असे सहायक संचालक मनपा नगर रचना कार्यालयातील तत्कालीन सर्वेक्षणात सहभागी असलेले देवपुजारी यांनी सांगितले.