आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Training Centre Director Dr. Shailendra Devalanakara

नैराश्य हे सायलेंट किलर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आजची तरुणाई दिवसेंदिवस नैराश्येच्या गर्तेत चालली आहे. हे नैराश्य त्यांना सायलेंट किलरप्रमाणे गिळत आहे. शिक्षण घेऊनही रोजगार मिळत नसल्यामुळे ही नैराश्याची दरी दिवसागिणक खोल होऊ लागली आहे. त्यामुळे तरुणाई आपसूकच व्यसनाधितेकडे वळत आहे. हीच परिस्थिती राहिली तर 2030 पर्यंत अधिकाधिक तरुणाई या दरीत लोटल्या जाईल. देशाच्या विकासासाठी ही घातक बाब आहे, असे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमालेप्रसंगी सोमवारी (दि. २२) विमलाबाई देशमुख सभागृहामध्ये आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी ते बालेत होते. "भारताच्या परराष्ट्र धोरणातील नवीन विचार प्रवाह' या विषयावर त्यांनी विचार मांडले.
डॉ. देवळाणकर म्हणाले, केंद्र शासनाने रोजगार कसा निर्माण करून द्यावा, याचा प्रथम विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातील साधन संपत्तीचा विकास होणे गरजेचे आहे. परराष्ट्र धोरण हे आर्थिक, राजकीय सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब आहे. काळ्या पैशांचा कधीही विकासकामांसाठी उपयोग होणार नाही. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चराचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्री-प्रायमरी, आरोग्य ग्रामीण क्षेत्रात परकीय गुंतवणूक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक दृष्टिकोनातून परराष्ट्र धोरणाचा विचार होणे गरजेचे आहे. आज मध्यमवर्गाचे प्रमाण वाढले आहे. तो आपल्या अधिकारांविषयी जागरूक झाला आहे. मध्यमवर्ग वाढल्यामुळे परराष्ट्र धोरणात मानवाधिकाराची चर्चा होऊ लागली, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. व्याख्यानमालेचे व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरूण शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी कला, वािणज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भूईभार यांची उपस्थिती होती. प्रास्तािवक प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांनी केले. विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.
चीनच्या प्रगतीची केलीस्तुती
एके काळी चीन प्रगतीच्या क्षेत्रात मागे होता. मात्र, आज त्याने जागतिक बाजारपेठ काबिज केली आहे. परकीय गुंतवणूक या देशाने वाढवली आहे. १९६२ च्या दृष्टिकोनातून चीनकडे पाहता, विकासाच्या क्षेत्रात त्याने घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
अर्थव्यवस्थेवर टाकला प्रकाश
देशाच्याअर्थव्यवस्थेचा टक्का वाढण्यासाठी कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक होणे गरजेचे आहे. मात्र, पाहिजे त्या पेक्षाही खूप कमी प्रमाणात गुंतवणूक होत आहे. प्रथम या तीन क्षेत्रातील गुंतवणूक शासनाने वाढवायला हवी, ती कशी वाढवता येईल, यावर डॉ. देवळाणकरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.