आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tree Plantation News In Amravti, Mews In Marathi

अडीचशे एकरांत साकारणार नीमवन, नीमवन असेल सर्वांसाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पर्यावरण संवर्धनासाठी महादेव खोरी परिसरातील गोरक्षण संस्थेच्या मालकीच्या गोवर्धन पर्वतावरील सुमारे 234 एकर जागेत नीमवन साकारले जाणार आहे. ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन आणि गोरक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लागवड केली जाणार आहे.
या नीमवनाशिवाय संपूर्ण शहर व परिसरातही एक लाख कडुनिंबाची रोपटी लावण्याचा संकल्प गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऑल महावीर धुळधर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केला आहे. उपक्रमाचा शुभारंभ एक ऑगस्ट रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांच्या हस्ते होणार आहे. शाळा, महाविद्यालये, मैदानं, ओसाड जमिनी आणि माळरानावर निंबाच्या बिया, रोपटी लावली जातील. यासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिक मंडळांची मदत घेतली जाणार असून, रोपट्यांची जबाबदारी शालेय विद्यार्थ्यांसोबतच प्रत्येक भागातील ज्येष्ठ नागरिकांकडे सोपवली जाईल. प्रत्येकजण एक किंवा दोन झाडं दत्तक घेऊन ते मोठे होतपर्यंत त्याची काळजी घेणार आहेत. कडुनिंबाचे वन साकारण्यासाठी गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश प्रसाद अग्रवाल, सचिव राजेंद्रकुमार नावंदर, रामप्रसाद सोनी, अँड. आर. बी. अट्टल, ओमप्रकाश भैया यांचेही मोठे योगदान राहणार आहे

पोलिस ठाण्यांनाही मिळणार कडुनिंबाची शीतल छाया
जिल्ह्यातील बहुतेक पोलिस ठाण्यांना कडुनिंबाची शीतल छाया मिळावी म्हणून वीस हजार रोपटी खरेदी करून त्यांची शहर व जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये लागवड करायची इच्छा विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी व्यक्त केली आहे. ते लवकरच या कामाला सुरुवात करणार आहेत.
नीमवनात गेल्यानंतर सर्वांना नवीन तजेला मिळावा, शरीरात नवचैतन्य निर्माण व्हावे, म्हणून ते जनहितार्थ साकारले जात आहे. ते सर्वांसाठी खुले असणार आहे. तेथे वृद्ध, तरुण, मध्यमवयीन, आजारी व्यक्ती कोणीही मोकळा श्वास घेऊ शकतील, असा मनोदय महावीर धुळधर यांनी व्यक्त केला.